Black Toe Nail : पायांची नखं काळी पडणं धोक्याचं, असू शकतात 'या' गंभीर आजाराची लक्षणं

पायांची नखे काळी पडल्याने तुम्हाला कोणत्या गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो याबाबत जाणून घेणार आहोत
Black Toe Nail
Black Toe Nailesakal
Updated on

Black Toe Nail : शरीरातील नकारात्मक बदल तुमच्या शरीरात काहीतरी विस्कटल्याची जाणीव तुम्हाला करून देतात. नखांच्या रंगावरूनही तुमच्या शरीरातील वेगवेगळ्या आजारांचा धोका ओळखता येतो. तेव्हा आज आपण पायांची नखे काळी पडल्याने तुम्हाला कोणत्या गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो याबाबत जाणून घेणार आहोत.

सहसा मातीचा जास्त संपर्क येणाऱ्या लोकांची नखे काळी असतात. मात्र काहींच्या बाबतीत अशी परिस्थिती नसताना देखील तुमची नखे काळी दिसतात. धावपटूंमध्ये हे मोठ्या प्रमाणात दिसून येते. पायांची नखे कोणत्या समस्येची लक्षणे असू शकतात ते आपण एक्सपर्टकडूनच जाणून घेऊया.

अवजड वस्तू तुमच्या पायावर पडल्याने नखांच्या नसा फाटतात. त्याने तुमचा रक्तप्रवाह नीट होत नाही. आणि तुमची नखे काळंवडू शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

पायांना त्रास जाणवणं

लांब धावण्यासाठी फीटेट फूटवेअरचा वापर केल्यास पायांना आणि नखांजवळील भागाला त्रास होतो. त्यामुळे खूप घट्ट शूज वापरू नका. सौम्य प्रकारच्या दुखण्यांमध्ये नख वाढतात. मात्र नखांचा काळसर भाग काढून टाकता येतो. मात्र काळवटपणा जास्तच असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वैद्यकीय उपचारांच्या मदतीने डेड नेल्स संपूर्णपणे काढून टाकता येते.

Black Toe Nail
Nails Health : नखे मजबूत करण्यासाठी काय करावे ?

स्कीन कॅन्सरचा धोका

तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण गंभीर प्रकारचा आजार हा नखांमध्येच वाढतो. यामुळे त्वचेचा रंग बदलू शकतो. Melanoma या स्कीन कॅन्सरच्या प्रकारामध्ये वेदना फारशा जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकदा दुर्लक्ष होते. नखांच्या पलिकडे क्युटिकल्समध्येही त्वचेचा रंग बदललेला असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका.

फंगल इनफेक्शन

नखांचा रंग निळा, पिवळा, हिरवा किंवा काळसर वाटत असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. फंगल इंफेक्शनच्या तीव्रतेवरून पुढील उपचार ठरवले जातात. (Disease)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()