Blood Donation : सोशल मीडियावरून रक्तदाते जोडणार, मेडिकलच्या रक्तपेढीचा अभिनव उपक्रम

Blood Donation : शहरातील शासकीय रुग्णालयांतील रुग्णसंख्या व तुलनेत असलेला रक्ताचा तुटवडा यासंबंधीचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले.
Blood Donation
Blood Donation esakal
Updated on

Blood Donation : शहरातील शासकीय रुग्णालयांतील रुग्णसंख्या व तुलनेत असलेला रक्ताचा तुटवडा यासंबंधीचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले. याची दखल घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) रक्ताचा तुटवडा कमी करण्यासाठी मेडिकलच्या रक्तपेढीने अभिनव उपक्रम सुरू केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना रक्तदान मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी ऑनलईन गुगल फॉर्म जारी करण्यात आला आहे.

मेयो व मेडिकलची दैनंदिन ओपीडी सुमारे पाच हजारावर आहे. आपत्कालीन परिस्थितीत दाखल झालेल्या रुग्णांची संख्याही दोनशेवर आहे. मेयो, मेडिकलचा विचार करता दर दिवसाला ८० रक्तपिशव्यांची गरज आहे. सध्या ही गरज पूर्ण होत नाही. ही बाब ‘सकाळ’ने उजेडात आणली. मेयो, मेडिकलसह डागा रुग्णालयासह दर दिवसाला ६० प्रसूती होतात. यातील ६० टक्के प्रसूती सिझेरियनद्वारे होतात.

यामुळे रक्ताची गरज पडतेच. या सिझेरियन प्रसूतीसह शस्त्रक्रिया, सिकलसेल, थॅलेसेमिया आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. त्यामुळे गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी सामाजिक सेवा संस्थांबरोबरच मेडिकल, मेयो, डागा या संस्थाही ऐच्छिक रक्तदान, शिबिरांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याचा प्रयत्न करतात. मात्र हे प्रयत्न आता अपूरे पडत आहे. त्यातच रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणारे रक्तदान कमी झाले.

मेडिकलच्या आदर्श रक्तपेढीने रक्तदाते वाढवण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तरुणांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणांना लवकरच रक्तदानाचे महत्त्व सांगून रक्तदानासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. ऑनलईन गुगल फॉर्म जारी करण्यात आला आहे. फॉर्मसोबत किशोर धर्माळे, विक्रम लांजेवार, डॉ. प्राजक्ता गादेवार, डॉ. अनुश्री, डॉ. मिताली यांची नावे व मोबाईल क्रमांक देण्यात आला आहे.

Blood Donation
Blood Shortage : कुणीतरी रक्त देता का रक्त..! मेडिकल, मेयोसह सुपर स्पेशालिटीत तुटवडा

गरजूंना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी मेडिकलने ऐच्छिक रक्तदान शिबिरांसह रक्तदान मोहिमेला चालना देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रक्तदात्यांची संख्या वाढवण्यासाठी मेडिकलच्या आदर्श रक्तपेढीकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात. शासकीय व खासगी कार्यालये, सार्वजनिक मंडळे, सामाजिक सेवा संस्था, महाविद्यालये आदी ठिकाणी रक्तदान करण्यासाठी लोकांना प्रवृत्त केले जाते. आता सोशल मिडियाद्वारे रक्तदात्यांनना रक्तदानाचे आवाहन करण्यात येईल.

- किशोर धर्माळे, समाज सेवा अधीक्षक (वैद्यकीय), मेडिकल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.