Health tips: आहारात 'या' दोन गोष्टींचा समावेश करा; रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

सध्याच्या जीवनशैलीत मधुमेह ही एक मोठी समस्या बनली आहे.
blood sugar health tips Benefits of eating Cashew and dates
blood sugar health tips Benefits of eating Cashew and dates
Updated on

सध्याच्या जीवनशैलीत मधुमेह ही एक मोठी समस्या बनली आहे. बदलत्या वातावरणामुळं मधुमेहाला केवळ वृद्धच नव्हे तर तरुणही बळी पडले आहेत. जेव्हा शरिर रक्तातील साखरेचा पूर्णपणे वापर करत नाही तेव्हा ही समस्या उद्भवते. रक्तातील साखरेची पातळी अचानक झपाट्याने वाढते आणि बरेच लोक घाबरून जातात. पण अशी वेळ न येण्यासाठी घरातच उपाय करा. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी केवळ दोन खास पदार्थाचे सेवन करणे फायद्याचे आहे.

मधुमेहामध्ये आहाराची काळजी घ्यावी लागते. तरुणांपासून ते वृद्ध प्रत्येकाने आपला आहार निरोगी ठेवला पाहिजे, मधुमेहाच्या रुग्णांना पौष्टिक खाद्यपदार्थाचे सेवन करणे खूप आवश्यक आहे. काजु आणि खजुर हे रिकाम्या पोटी खाल्याने खुप फायद्याचे ठरतात. खजुर आणि काजु हा रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात.

blood sugar health tips Benefits of eating Cashew and dates
Health Tips : आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी 'हा' आहार आहे पोषक, पचन सुधारण्यासही होते मदत

खजुरामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर मिळतं. ज्याने तुमची पचनक्रिया चांगली राहते. त्यासोबतच याचे अनेक फायदेही आहेत. खजुरामध्ये आयर्न, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, तांबे इत्यादी पोषक तत्वे असतात. डायबिटीस रूग्णांसाठी खजूर खाणं फायदेशीर ठरतं की नाही? तरिदेखील डायबिटीस रूग्ण १ ते २ खजूर खाऊ शकतात. परंतु, त्यासाठी ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही साखर नसलेल्या दूधामध्ये खजूर उकळून ते दूध पिऊ शकता.

blood sugar health tips Benefits of eating Cashew and dates
Monsoon Health Tips :पावसाळ्यात चहा-भजीचं कॉम्बिनेशन आहे बेस्ट; पण, आधी आमचं थोड ऐकून घ्या, नाहीतर महागात पडेल

खजुर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते. खजूरमध्ये ग्लूकोज आणि प्रुक्टोज मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे डायबिटीस कंट्रोलमध्ये राहते. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही मदत होते.

काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहता येत.

काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी,के चे प्रमाण अधिक असते. तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचे प्रमाण देखील सर्वाधिक असते. काजू खाल्यामुळे एनर्जी वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होते.

blood sugar health tips Benefits of eating Cashew and dates
Health Care News : वजन कमी करण्यासाठी 'या' हेल्दी सॅलडचा आहारात समावेश करा, लवकरच दिसेल फरक

काजूत हेल्थी फॅट्सच प्रमाण अधिक आहे. त्यामुळे डायबिटीस, रक्तदाब, लठ्ठपणा यावर काजू फायदेशीर ठरतात. यात प्रोटीन आणि विटामिनचं प्रमाण देखील जास्त आहे. तसेच काजू खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

काजूमध्ये अ‍ॅनकार्डिक ॲसिड असते. जे शरीरातील ग्लुकोज पेशींमध्ये पोहोचण्यास मदत करते. यामुळे रक्तामध्ये ग्लूकोज जात नाही आणि रक्तातील साखर वाढत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.