Blood Type Diet : तुमच्या शरीरात वाहणारे रक्त एखाद्या आजार आणि त्यावरील उपचारांवर परिणाम करते. बहुतेक व्यक्तींचा रक्तगट O+, O-, A+, A-, B+, B-, AB+ आणि AB- यापैकी एक असतो. या सर्व रक्त गटाचे स्वतःचे खास असे गुणधर्म आहेत.
हेही वाचा : Shraddha Walker Case: वेबसीरीज ठरतेय का गुन्ह्यांचं गाइडबुक?
अनेक अभ्यासांमध्ये रक्त गटाचा प्रकार हृदयविकाराच्या जोखमीशी जोडला गेला आहे. A, B आणि AB रक्त गट असणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. तर, काही अभ्यासातून O रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना डास चावण्याची शक्यता जास्त असते. आज आम्ही रक्तगटाच्या आधारानुसार नेमका कोणता आहार घ्याव्या यबद्दल सांगणार आहोत.
ब्लड ग्रुपनुसार आहार घेण्याचे फायदे
नॅचरोपॅथी फिजिशियन पीटर डी'अॅडमो यांनी केलेल्या संशोधनावर आधारित 'द ब्लड टाईप डाएट' मध्ये म्हटले आहे की, प्रत्येक व्यक्ती त्यांच्या ब्लडग्रुपनुसार आहाराचे सेवन करून निरोगी राहू शकतो तसेच वजनावर नियंत्रण मिळवू शकतो.
रक्त गटानुसार आहाराचे सेवन केल्याने हे पदार्थ अधिक प्रभावीपणे पचवले जातात. याचा थेट परिणाम तुमच्या शरिरावर होतो. तज्ज्ञांच्या मते औषधी वनस्पती, मसाले आणि व्यायामाची निवड व्यक्तीच्या रक्तगटानुसार असावी.
ब्लड ग्रुपनुसार असा असावा आहार?
A ब्लड ग्रुप असणाऱ्यांनी कोणता आहार घ्यावा
ज्या व्यक्तींचा ब्लड ग्रुप A आहे अशा व्यक्तींनी मांसाचे पदार्थ खाणे टाळावेत. तसेच आहारात फळे आणि भाज्या, बीन्स आणि शेंगा आदींचा समावेश करावा. कारण A रक्तगट असलेल्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक संवेदनशील असते. या व्यक्तींसाठी वजन कमी करण्यासाठी सी फूड, भाज्या, अननस, ऑलिव्ह ऑईल आणि सोया उत्तम मानले जाते. या व्यक्तींनी आहारात दुग्धजन्य पदार्थ, गहू, कॉर्न आणि राजम्याचे सेवन टाळावे.
ज्या व्यक्तींचा ब्लड ग्रुप B आहे अशांनी व्हरायची असलेल्या आहाराची निवड करावी. ज्यामध्ये मांस, फळे, दुग्धजन्य पदार्थ, समुद्री अन्न आणि धान्य आदींचा समावेश असावा. या रक्त गटाच्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी हिरव्या भाज्या, अंडी आदींचे सेवन करावे. पण चिकन, कॉर्न, शेंगदाणे आणि गव्हाचे पदार्थ खाणे टाळावेत.
AB ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींनी डेअरी, टोफू, मासे, तृणधान्ये, फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. वजन कमी करण्यासाठी या व्यक्तींनी टोफू, सी फूड, हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो. या व्यक्तींनी आहारात चिकन, मका, राजमा खाणे टाळावे.
O ब्लड ग्रुप असणाऱ्या व्यक्तींनी हाय प्रोटीन असलेल्या पदार्थांची निवड करावी. या व्यक्तींनी अधिक मांस, भाज्या, मासे आणि फळे खावीत. तर, सोयाबीनचे आणि शेंगांपासून बनलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे. वजन कमी करण्यासाठी सीफूड, रेड मीट, ब्रोकोली, पालक आणि ऑलिव्ह ऑइल सर्वोत्तम मानले जाते. या व्यक्तींनी आहारात गहू, कॉर्न आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे.
ब्लड ग्रुपनुसार आहार घेणे कितपत फायदेशीर?
2014 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, ज्या व्यक्तींनी ब्लड ग्रुपनुसार डाएटचे पालन केले आहे त्यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरमध्ये सुधारणा झाल्याचे दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.