Body Massage Benefits : बदलत्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाच्या आयुष्यात तणाव वाढत आहे. तासनतास एकाच जागी बसून काम केल्याने. चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे, शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होत असल्याने तुम्हाला अनेकदा त्रास होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बॉडी मसाज करू शकता.
तुम्हाला माहिती आहे का, की बॉडी मसाज केल्याने केवळ शरीरालाच नाही तर, मनालाही अनेक फायदे मिळतात. मानसिक आरोग्य सुधारते आणि त्यामुळे शरीरही सुदृढ होते. बॉडी मसाजचा फायदा तुम्हालाही व्हावा असे वाटत असेल तर तो कसा करावा, त्याचे फायदे काय आहेत याबद्दल जाणून घेऊयात.
तणावापासून मुक्ती
नियमित शरीर मालिश केल्याने कोर्टिसोलची पातळी कमी होते. खरं तर हा एक प्रकारचा हार्मोन आहे. ज्यामुळे आपल्याला तणाव जाणवतो.
बॉडी मसाज केल्याने तणावासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. मसाजमुळे शरीराचं दुखणं थांबत आणि मन रिलॅक्स होतं. दुखण्यात आराम मिळतो मसाजमुळे शरीरात रक्ताभिसरण वाढते. हे जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी आहे. ज्यामुळे तुम्हाला स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो.
नसा मोकळ्या होतात
मसाज केल्याने शरीरातील अवघडलेल्या धमन्या मोकळ्या होतात. त्यामुळे ब्लॉक झालेल्या धमन्यांनाही चांगला फायदा होतो. नियमित मसाज केल्याने नसांना आराम मिळतो. यामुळे मनही शांत राहते. ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते.
शांत झोप लागते
मसाज केल्याने शांत झोप लागते. ज्यांना निद्रानाशाची समस्या आहे. त्यांना फायदा होतो. समस्या दूर करा जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी बॉडी मसाज करा. यामुळे थकवा दूर होईल आणि त्याच वेळी तुम्हाला गाढ झोप लागेल. मसाज केल्याने शरीर आणि मनाला आराम मिळतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीराच्या मसाजमुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते. होय, हे शरीरात पांढऱ्या रक्त पेशी तयार करण्यास उपयुक्त आहे आणि तणाव कमी करून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करते. ज्याद्वारे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
शारीरिक वेदना
शारीरिक वेदना दूर करण्यासह बॉडी मसाजमुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता देखील मजबूत होते. एका अभ्यासातील माहितीनुसार, लिम्फ नोडच्या आसपास मसाज केल्यानं पांढऱ्या रक्तपेशींच्या प्रवाहाची गती वाढते. या पेशी अधिक सक्रिय होतात आणि आजारांविरोधात लढण्यास शरीरास मदत करतात.
मेंदू शांत होतो
योग्य पद्धतीने मसाज केल्यास शरीर आणि मेंदूलाही पूर्णपणे विश्रांती मिळते. थाय आणि अरोमाथेरेपी मसाजमुळे मेंदू शांत राहण्यास मदत मिळते. अशा प्रकारच्या मसाजसाठी सुगंधित एसेंशिअल ऑइलचा वापर केला जातो.
शरीराची झीज
ज्या महिलांची डिलिव्हरी होऊन दोन वर्ष झालेली असतात. त्यांना कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास होतो. त्यावेळी मसाज केल्याने त्यांना फायदा होतो. गरोदरपणात शरीराची झालेली झीज भरून काढण्याचं कामही मसाजच करतो.
मसाज करताना अशी घ्या काळजी
बॉडी मसाज केल्याने कित्येक प्रकारच्या शारीरिक समस्या दूर होतात. पण मसाज थेरेपिस्ट अथवा तज्ज्ञमंडळीच्या मार्गदर्शनानुसार तसंच चांगल्या तेलाच्या मदतीनेच मसाज थेरेपी करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.