सहज व अचानक मिळालेली मदत, पैसा म्हणजे ‘बोनस’. आपापले काम व्यवस्थित करणे हे तर प्रत्येकाचे कर्तव्यच असते; परंतु एखाद्याने जीव ओतून व स्वतःची क्षमता, बुद्धी व कार्यक्षमता पुरेपूर वापरून कमी वेळात काम केले व त्या कामात ओतलेले प्रेम समोरच्याला दिसले व त्या कामाचे मूल्यमापन नेहमीच्या पद्धतीने न करता वेगळ्या रूपात करून दिलेले बक्षीस म्हणजे ‘बोनस’.