Brain Damage : रोजच्या या सवयींमुळे ब्रेन डॅमेज होऊ शकतो! वेळीच सोडा या सवयी, नाहीतर...

तुमच्या रोजच्या काही सवयी तुमच्या मेंदूच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात
Brain Damage
Brain Damageesakal
Updated on

Brain Damage : मेंदू आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा अवयव आहे. ज्याद्वारे आपली ज्ञानेंद्रिये नियंत्रित होतात. अशावेळी तुमच्या मेंदूचे आरोग्य नीट जपणे फार महत्वाचे आहे. तुमच्या रोजच्या काही सवयी तुमच्या मेंदूच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. या सवयी वेळीच बदलणे फार गरजेचे आहे.

तुमच्या दैनंदिन वागण्याचा तुमच्या मेंदूवर प्रभाव होत असतो. एक्सरसाइज करणे, भरपूर झोप घेणे, बॅलेंस डाएट घेतल्याने मेंदूला भरपूर प्रमाणात पोषण आणि ऑक्सिजन मिळतं. तर मेंदूवर ताण पडल्यास किंवा अनहेल्दी पदार्थ खाल्ल्याने मेंदूचा विकास मंदावतो. त्याचा प्रभाव तुमच्या स्मरणशक्ती आणि संपूर्ण मेंदूच्या आरोग्यावर पडतो.

रोजच्या या सवयी तुमचा मेंदू डॅमेज करते

जीवनशैली

रेग्युलर एक्सरसाइज करण्याऐवजी जे लोक काउचवर बसल्या बसल्या दिवस काढतात त्यांचा मेंदू वेळेआधीच कमकुवत होतो. कालांतराने त्याचे रुपांतर अनेक आजारांत होऊ शकते.

झोप न येणे

जे लोक ७-८ तास झोप घेतात, त्यांचा मेंदू वेळेआधीच म्हातारा होतो. याचा प्रभाव तुमच्या त्वचेवरही दिसून येतो. कमी झोपल्याने स्ट्रेस लेव्हलही वाढते.

स्ट्रेस

अति ताणाचासुद्धा तुमच्या मेंदूवर नकारात्मक प्रभाव पडतो. अशावेळी तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी रोज मेडिटेशन आणि योगा करा. (Brain Disease)

Brain Damage
Brain Disease : मेंदूविकाराने ग्रस्त आफ्रिकी मुलाला महाराष्ट्रीय डॉक्टरने दिले जीवदान

खाण्यापिण्याकडे दूर्लक्ष

तुमच्या दैनंदिन आहारात काय खाता याचा परिणाम तुमच्या मेंदूवर होतो. शुगरचे अधिक सेवन केल्याने तुमचा मेंदू संकुचित होतो. त्यामुळे मेंदूपर्यंत होणाऱ्या रक्तपुरवठ्याची गती मंदावते. जेव्हा मेंदूपर्यंत रक्तपुरवठा सुरळीत होत नाही तेव्हा अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. तेव्हा डाएटमध्ये फळांचा आणि भाज्यांचा समावेश करून घ्या. (Health)

Brain Damage
Human Brain : माणसाचा मेंदू किती GB चा असतो माहितीये? जाणून घ्या

जास्तीत जास्त वेळ ऑनलाइन घालवणे

मागल्या काही काळापासून लोकांचा स्क्रीन टाइम वाढलाय. एजिंग अँड मेकॅनिझम ऑफ डिसीज मध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, कंप्युटर आणि स्मार्टफोनमधून निघणारी ब्ल्यू लाइट तुमच्या डोळ्यांवर आणि स्किनवर वाइट प्रभाव पाडते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.