Breast Cancer : स्तनाचा कर्करोग आणि उपाय

आनुवंशिकता, जीवनशैली आहार आणि वातावरण याकारणांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका
Breast
Breastsakal
Updated on

स्तनाचा कर्करोग चिंताजनक आहे. परंतु जीवनशैली, आहार आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातील साध्या बदलांद्वारे त्याला प्रतिबंधित केले जाऊ शकते. अलीकडच्या काळात आनुवंशिकता, जीवनशैली आहार आणि वातावरण याकारणांमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढला आहे. स्तनाचा कर्करोग टाळायचा असल्यास शरीराकडून मिळत असलेले संकेत, वंशपरंपरागत वैद्यकीय इतिहास याबद्दल जागरूक असावे.

स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी टिप्स

योग्य सौंदर्यप्रसाधने निवडा : आपण वापरत असलेल्या सौंदर्यप्रसाधनांमुळे कर्करोग होऊ शकतो याची जाणीव नसते. अॅल्युमिनियमच्या कॅनमध्ये पॅक केलेले डिओडोरंट किंवा अँटीपर्सपिरंट स्प्रे टाळा. सौंदर्यप्रसाधने, शाम्पू, केसांचा रंग, जेल, नेलपॉलिश, ऑस्ट्रोजेन, पॅराबेन किंवा फॅथलेट्स असलेले सनस्क्रीन टाळा. शक्यतो एस्ट्रोजेन, पॅराबेन किंवा सेंद्रिय उत्पादने वापरा.

मातीच्या भांड्यात शिजवा : पॉलिव्हिनाइल क्लोराईड, पॉलिस्टीरिन किंवा स्टायरोफोमने बनवलेल्या प्लॅस्टिकच्या डब्यांमध्ये अन्न गरम करणे किंवा तयार केल्याने कालांतराने हानिकारक परिणाम होऊ शकतात. स्क्रॅच टेफ्लॉन पॅनमध्ये अन्न तयार करणे टाळा. त्याऐवजी, मातीच्या भांड्यात शिजवा आणि काचेच्या किंवा सिरॅमिक कटलरीत अन्न गरम करा.

Breast
Breast Cancer : वेळेत निदान झाल्यास मृत्यूचा धोका टळतो, तेव्हा महिलांनी वेळेत घ्या ही काळजी

स्तन्यपान : स्तन्यपान केल्याने रजोनिवृत्तीपूर्वीचा आणि रजोनिवृत्तीनंतरचा स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. स्तन्यपान करवण्याच्या काळात, हार्मोनल बदल होतात, त्यामुळे मासिक पाळीला विलंब होतो. परिणामी इस्ट्रोजेन हार्मोनचे उत्पादन कमी होऊ शकते. इस्ट्रोजेन हार्मोनची उच्च पातळी स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते.

निरोगी वजन राखा : वजन वाढणे हे स्तनाच्या कर्करोगाच्या वाढत्या जोखमीशी जोडले गेले आहे. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे. प्रक्रिया केलेले किंवा जंक फूड आहार टाळा त्याऐवजी पौष्टिक आणि सहज पचण्याजोगा सात्त्विक आहार घ्या. माफक प्रमाणात आणि नियमित अंतराने खा. पाणी, ताक, फळांचा रस यासारखे द्रवपदार्थ घ्या. ते पोटभरीचे असून जास्त खाण्यापासून प्रतिबंधित करतात. चरबीयुक्त पदार्थ टाळा. फळे आणि भाज्या, संपूर्ण धान्य, कडधान्ये आणि शेंगा, दुग्धजन्य पदार्थ यासारखे निरोगी स्नॅक्स आणि जेवणाचे पर्याय निवडा.

Breast
Breast Cancer : धक्कादायक! ६९० महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

ऑलिव्ह ऑईल, सूर्यफूल तेल, कॅनोला तेल किंवा खोबरेल तेल यासारख्या निरोगी तेलात आपले जेवण शिजवा.

आनुवंशिकतेबद्दल जागरूकता : कर्करोगाचा महत्त्वपूर्ण कौटुंबिक इतिहास असलेल्या महिलांनी अतिरिक्त सावधगिरी बाळगावी. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना स्तनाचा, अंडाशयाचा किंवा प्रोस्टेटचा कर्करोग झाला असल्यास स्तनाच्या कर्करोगाचा धोका असू शकतो.

सक्रिय राहा : शारीरिकरीत्या सक्रिय असण्यामुळे स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. नियमित व्यायामामुळे तंदुरुस्त राहण्यास आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. दररोज ३० मिनिटे वेगवान चालायला जा. गायमुखासन, साधे हात स्ट्रेच, यष्टिकासन, भुजंगासन, धनुर्वक्रासन यासारख्या आसनांचा सराव करा. त्यामुळे छातीचे स्नायू ताणून ते बळकट होण्यास मदत होईल.

Breast
Breast Cancer : गर्भनिरोधक गोळ्यांमुळे होऊ शकतो स्तनांचा कर्करोग

दारू सोडणे : अल्कोहोल हे विविध समस्यांचे प्रमुख कारण आहे. जास्त प्रमाणात मद्यपान करणे हे स्तनाच्या कर्करोगाशी जोडलेले आहे. तंबाखू कोणत्याही स्वरूपात टाळा आणि धूम्रपान न करण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करा.

स्तनाचा कर्करोग ही चिंताजनक स्थिती आहे, परंतु त्याबद्दल घाबरू नका किंवा तणावग्रस्त होऊ नका. नेहमी आनंदी वृत्ती ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.