Breast Cancer : अलीकडे जीवनातील प्राधान्यक्रम बदलत आहेत. लग्न उशिरा होतात. गर्भधारणेस उशीर होतो. बाळाला स्तनपान करण्यापेक्षा बाहेरच्या दुधाची सवय लावली जाते. अशा अनेक कारणांमुळे शहरी महिलांना ब्रेस्ट कॅन्सरची जोखीम वाढली आहे.
कधीकाळी अवघ्या चार ते पाच टक्के असलेला ब्रेस्ट कॅन्सर आता महिलांच्या एकूण कॅन्सर रोगापैकी १४ टक्क्यांवर आला आहे. यात दरवर्षी १ लाख ८० हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. विशेष म्हणजे अनेक महिलांच्या ब्रेस्ट कॅन्सरचे निदान स्टेज-३ व स्टेज-४ मध्ये होते. त्यामुळे मृत्यूची जोखीम वाढली. वेळेत निदान झाल्यास ९९ टक्के नियंत्रण मिळवून सामान्य जीवन जगता येते.
ऑक्टोबर स्तन कॅन्सर जनजागृती महिना म्हणून पाळला जातो. स्तन कर्करोगाची लक्षणे आढळल्यास वैद्यकीय तपासणी केल्यावर मॅमोग्राफीचा सल्ला देतात. वयाच्या ३५ नंतर वर्षातून एकदा मॅमोग्राफी करावी. कर्करोगाची जोखीम अधिक असेल तर वयाच्या २५ नंतर मॅमोग्राफी करणे हितावह आहे.
ब्रेस्ट किंवा काखेत गाठ
ब्रेस्टच्या त्वचेची जाडी वाढणे
ब्रेस्टचा आकार बदलणे
स्तनाग्रे आत ओढल्या जाणे
ब्रेस्टमध्ये रक्तस्राव
ब्रेस्टच्या त्वचेवर लालसरपणा
मद्यपान टाळावे
मर्यादित हॉर्मोनल थेरपी
आरोग्यदायी जीवनशैली ठेवा
नियमित व्यायाम करावा
संतुलित आहार घ्यावा
लठ्ठपणावर नियंत्रण ठेवावे
ब्रेस्ट कॅन्सरसाठी वय, पूर्व इतिहास, आनुवंशिकता, किरणोत्सर्गाचा प्रादुर्भाव, लवकर पाळी येणे, उशिरा रजोनिवृत्ती अशा अनेक बाबी कारणीभूत आहेत. अशावेळी स्वतःच महिलांनी ब्रेस्ट तपासणी केली तर त्यामध्ये होणारे बदल सहजतेने कळतील. ब्रेस्टमध्ये गाठ किंवा इतर बदल आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यामुळे वेळेत निदान होईल आणि भविष्यात सामान्य जीवन जगता येईल.
-डॉ. नितीन बोमनवार, कॅन्सर सर्जन, नागपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.