Cancer Treatment Cost : कर्करोगाचे उपचार महाग का? कर्करोगावरील औषधांवर एकूण किती खर्च येतो? घ्या जाणून

Cancer Treatment Cost : अर्थसंकल्पात कर्करोगाच्या ३ औषधांवरील कस्टम ड्युटी मोफत करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
Cancer Treatment Cost
Cancer Treatment Costesakal
Updated on

Cancer Treatment Cost : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. विशेष म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा सलग ७ वा अर्थसंकल्प होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर, भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प होता.

या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आरोग्य क्षेत्राबाबत काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यांनी वेगवेगळ्या सेक्टरसाठी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या. यामध्ये कर्करोगाच्या ३ औषधांवरील कस्टम ड्युटी मोफत करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली. त्यामुळे, आता कॅन्सरची महागडी औषधे स्वस्त होणार आहेत. त्यामुळे, कर्करोगावरील उपचार घेणाऱ्या रूग्णांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

या व्यतिरिक्त सरकारने एक्स-रे मशिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या एक्स-रे ट्यूबवरील शुल्कही कमी केले आहे. अशा स्थितीमध्ये सरकारने केलेल्या या महत्वपूर्ण घोषणेनंतर कॅन्सरच्या उचारांवर नेमका किती खर्च होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

खरे तर दरवर्षी आपल्या देशातील अनेक नागरिक या कर्करोगाला बळी पडतात. दिवसेंदिवस या आजाराचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे, ही चिंतेची बाब आहे. या आजारामुळे मृत्यूची शक्यता खूप जास्त असते. कर्करोगावरील महागडे उपचार आणि शेवटच्या टप्प्यात त्याची पडताळणी होणे हे त्या मृत्यूंमागील प्रमुख कारण आहे. चला तर मग जाणून घेऊयात कर्करोगाचा उपचार करण्यासाठी एकूण किती खर्च येतो?

Cancer Treatment Cost
Healthcare Union Budget 2024 : अर्थसंकल्पात कर्करोगाच्या रूग्णांना दिलासा, कॅन्सरची औषधे होणार स्वस्त..!

कॅन्सरवरील उपचार महाग का?

कर्करोग हा एक जीवघेणा आणि गंभीर आजार आहे. मागील वर्षी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या एका समितीच्या अहवालात असे नमूद करण्यात आले होते की, कर्करोगावरील उपचारांसाठी केवळ २० टक्के रूग्णांना रेडिएशन थेरपीची सुविधा मिळते.

परंतु, WHO च्या म्हणण्यानुसार, दर १० लाख लोकसंख्येमागे एका रेडिएशन थेरपीची मशिन असणे आवश्यक आहे. त्यानुसार, देशात सुमारे १ हजार ३०० रेडिओथेरपी मशिन्सची आवश्यकता आहे. परंतु, आपल्याकडे केवळ ७०० मशिन्स आहेत. ज्यामुळे, समस्या उद्भवत आहेत.

महत्वाची बाब म्हणजे सरकारी आणि खासगी मिळून केवळ २५० रूग्णालयांमध्येच ही रेडिओथेरपी उपलब्ध असून, त्यापैकी २०० खासगी रूग्णालये आहेत. ज्या ठिकाणी कर्करोगावरील उपचार अतिशय महागडे आहेत.  

भारतात कर्करोगावरील उपचारांवर किती खर्च येतो?

कर्करोगाचे अनेक प्रकार आहेत. त्यामुळे, प्रत्येक प्रकारानुसार कर्करोगावरील औषधे आणि उपचारांचा खर्च ही वेगळा आहे. जर सरासरी खर्च पाहायचे झाल्यास, कर्करोगावरील उपचार हे २ लाख ८० हजार ते १० लाख ५० हजारांच्या घरात आहेत.

परंतु, कर्करोगावरील खर्च हा कर्करोगाच्या प्रकारानुसार आणि स्टेजनुसार कमी-अधिक प्रमाणात असू शकतो. आता केमोथेरपीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतात केमोथेरपीचा खर्च हा प्रत्येक वेळी १८ हजार रूपये येतो.

Cancer Treatment Cost
Budget 2024: निर्मला सितारमन यांचा सुद्धा गुलाबी पॅटर्न ! अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पांढरी साडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.