Calory Intake For Weight Loss : या 5 पद्धतींनी कमी करा कॅलरी इनटेक, वजन झटक्यात कमी होईल

कॅलरी इनटेक कमी कसा करावा याच्या काही सोप्या टिप्स आज आपण जाणून घेऊया.
Calory Intake For Weight Loss
Calory Intake For Weight Loss esakal
Updated on

Calory Intake For Weight Loss : एकदा वजन वाढले की ते लगेच कमी होणे कठीणच. हल्ली बहुतांश लोक त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे त्रस्त आहे. वजन कमी करण्यासाठी लोक विविध उपाय करतात. पण अनेक वेळा डाएटिंग करून आणि जिममध्ये तासनतास घाम गाळूनही वजन कमी होत नाही. खरं तर, वजन कमी करण्यासाठी कॅलरीज इनटेकवर लक्ष देणे खूप आवश्यक आहे. तुम्ही दिवसातून किती कॅलरीज इनटेक करता याचा संबंध तुमच्या वजन वाढीशी असतो. तेव्हा कॅलरी इनटेक कमी कसा करावा याच्या काही सोप्या टिप्स आज आपण जाणून घेऊया.

आपण दिवसभरात जेवढ्या कॅलरीज घेतो त्यापेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे हे वजन कमी करण्यासाठी फार महत्वाचे आहे. जेव्हा कॅलरीजचे प्रमाण कमी असते, तेव्हा शरीर चरबीचे ऊर्जेत रूपांतर करते आणि त्याचा वापर करते. त्यामुळे शरीराचे वजन कमी होऊ लागते. बरेच लोक कॅलरी कमी करण्यासाठी खूप कमी खाणे किंवा जेवण वगळणे सुरू करतात. परंतु आवश्यकतेपेक्षा कमी कॅलरी घेतल्यास तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो.

याचा परिणाम तुमच्या पाचनशक्तीवरही होतो, ज्यामुळे वजन वाढते. आता प्रश्न पडतो की वजन कमी करण्यासाठी कॅलरीजचे प्रमाण कमी कसे करावे? आज या लेखात, आहारतज्ञ अंतरा देबनाथकडून आपण कॅलरी कमी करण्याच्या काही सोप्या पद्धतींबद्दल जाणून घेणार आहोत. या टिप्सचे पालन केल्याने वजन कमी करण्यात मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया कॅलरी कमी करण्याचे काही सोपे उपाय

1. आहारातील प्रोटीनचे प्रमाण वाढवा

जर तुम्हाला तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी करायचे असेल तर तुमच्या आहारातील प्रोटीनचे प्रमाण वाढवा. प्रोटीन खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि तुम्हाला दीर्घकाळ भूक लागत नाही. प्रोटीन इनटेकमुळे तुमची पचनशक्तीही वाढते, ज्यामुळे अतिरिक्त कॅलरी आणि चरबी बर्न करण्यास मदत होते.

Calory Intake For Weight Loss
Weight Loss Journey : प्रथमेशने घरीच कमी केलं १४ किलो वजन, 'या' आयुर्वेदिक उपायांमध्ये आहे सिक्रेट

2. भरपूर पाणी प्या

कॅलरी कमी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पाणी पिणे. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे माणसाला वारंवार भूक लागते. अशा स्थितीत आपण जास्त अन्न खातो, त्यामुळे वजन वाढू लागते. म्हणूनच तुम्ही भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विशेषत: जेवण करण्यापूर्वी अर्धा तास एक ते दोन ग्लास पाणी प्यावे. यामुळे तुमचे पोट भरलेले असेल आणि तुम्ही जास्त खाणे टाळाल. (Weight Loss)

3. एका लहान प्लेटमध्ये जेवण घ्या

लहान ताटात जेवण करूनही तुम्ही कॅलरीजचे प्रमाण कमी करू शकता. जेव्हा आपण मोठ्या ताटात अन्न खातो, तेव्हा जेवणाचे प्रमाणही वाढते. त्यामुळे जेव्हा तुम्ही लहान ताटात जेवता, तेव्हा तुम्ही कमी खाल. यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

Calory Intake For Weight Loss
Sleep Weight Loss : व्यायाम अन् डाएट करून नाही तर झोपूनही कमी करता येतं वजन, कसं? जाणून घ्या

4. कार्ब आणि साखर कमी करा

कार्बोहायड्रेट्स आणि साखरयुक्त पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात. जंक आणि प्रोसेस्ड फूड, कोल्ड्रिंक्स, कुकीज आणि मिठाई यांचे सेवन केल्याने तुमच्या कॅलरीजची संख्या लक्षणीयरीत्या वाढू शकते. तसेच त्यांच्या अतिसेवनामुळे लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. म्हणूनच या पदार्थांपासून दूर राहणे किंवा कमी प्रमाणात सेवन करणे चांगले. (Lifestyle)

Calory Intake For Weight Loss
Weight Loss Diet : बरेच प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही? आहारातला हा लहानसा बदल करेल जबरदस्त परिणाम

5. आहारात भाज्यांचे प्रमाण वाढवा

जर तुम्हाला कॅलरीजचे प्रमाण कमी करायचे असेल तर आहारातील फायबरचे प्रमाण वाढवा. यासाठी भाज्यांचे सेवन जास्त करावे. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय, पचनसंस्था निरोगी ठेवण्यासही मदत होते. वजन कमी करण्यासाठी, योग्य पचन आवश्यक आहे. यासाठी जेवणात कोशिंबीर आणि भाज्यांचे प्रमाण अधिक ठेवावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.