एका व्यक्तीला ओमीक्रॉनचा पुन्हा संसर्ग होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Can a person be infected with Omicron twice?
Can a person be infected with Omicron twice? E sakal
Updated on

Omicron : ''ओमिक्रॉन ला कोविड री-इन्फेक्शन (Covid Reinfection) कारणीभूत म्हणून ओळखले जाते. एखाद्या व्यक्ती लस टाळण्याच्या ताणामुळे पुन्हा बाधित (the vaccine dodging strain again) झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही,'' असे भारतीय आरोग्य तज्ञांनी सोमवारी सांगितले. मात्र, त्यांनीही अशी शक्यताही नाकारली नाही.

एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती जी आधीच्या संसर्गामुळे किंवा लसीकरणामुळे निर्माण झालेली असते, त्यात मूळ विषाणूची स्मृती असते. परंतु ओमिक्रॉन हे डेव्हीएंट( deviant) असल्याने, याचा अर्थ असा आहे की, तो त्याच्या मूळ कोविड स्ट्रेनपासून खूप वेगळा झाला आहे, त्यात अनेक समानता आहेत.

परिणामी, "आपली रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसला मूळ व्हायरस म्हणून ओळखण्यात अयशस्वी ठरते आणि त्यामुळे पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असते. सोबतच नैसर्गिकरित्या संक्रमित व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती कमी होत असल्याने, पुन्हा संसर्ग होण्यास हातभार लागतो.", असे डॉ. दिपू टीएस, सहयोगी प्राध्यापक, संसर्गजन्य रोग विभाग, अमृता हॉस्पिटल, कोची, यांनी IANS ला सांगितले.

''पुन्‍हा संसर्ग होत असेल तरी, एखाद्या व्‍यक्‍तीमध्‍ये ओमिक्रॉनची पुनरावृत्ती होण्‍याच्‍या बाजूने अद्याप ठोस पुरावा नाही, असे डॉ. अशोक महाशूर, पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल आणि एमआरसी, माहीम, मुंबईचे सल्लागार चेस्ट फिजिशियन जोडले.(Can a person be infected with Omicron twice? Here what experts have to say)

यूकेच्या इम्पीरियल कॉलेज लंडनच्या नेतृत्वाखालील अलीकडे झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की,'' ओमिक्रॉन व्हेरिअंटचा पुन्हा संसर्ग होण्याचा धोका डेल्टा प्रकारापेक्षा 5.4 पट जास्त आहे. “याचा अर्थ असा आहे की आधीच्या संसर्गजन्य ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे पुन्हा संसर्गापासून संरक्षणाची शक्यता 19 टक्के इतके कमी असू शकते," संशोधकांनी सांगितले.

Can a person be infected with Omicron twice?
अरोमाथेरपी म्हणजे काय? तुमच्यासाठी कशी फायदेशीर,जाणून घ्या

डॉ. राहुल पंडित डायरेक्टर, क्रिटिकल केअर, फोर्टिस हॉस्पिटल्स मुंबई, म्हणाले, "ओमिक्रॉनमुळे पुन्हा संसर्ग होतो कारण त्यात 'इम्यून एस्केप फिनोमिना' असतो - याचा अर्थ असा होतो की, ''ज्यांना आधी संसर्ग झाला होता आणि त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज होत्या, त्या कारणामुळे किंवा ज्यांना लसीकरण केलेल्यामुळे ज्यांच्याकडे अँटीबॉडीज आहेत किंवा दोन्ही कारणे आहेत, त्यालाच 'हायब्रिड इम्युनिटी' म्हणून ओळखले जाते."

ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनवर(spike proteins) 30 पेक्षा जास्त उत्परिवर्तन (mutations)आहेत,ज्यामुळे रोग प्रतिकारशक्तीपासून वाचविण्यास मदत करतात. म्हणूनच ज्यांना पूर्वी अँटीबॉडीज आहेत अशा लोकांना देखील ते संक्रमित करत आहे.

"तथापि, या लोकांमध्ये ओमिक्रॉनचा संसर्ग पुन्हा होईल की नाही हे समजू शकलेले नाही; याचा अभ्यास करणे बाकी आहे," असे पंडित IANS ला सांगितले, जे राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या कोविड -19 टास्कफोर्सचे सदस्य आहेत.

''असा पुन्हा संसर्ग होईल की नाही असा अंदाज आपण लावू नये. ओमिक्रॉनच्या रुग्णाला दुसर्‍या ओमिक्रॉन संसर्गाने पुन्हा संसर्ग झाल्याची कोणतीही घटना मी पाहिली नाही, वैद्यकीय जर्नल्स आणि मेडिकलमध्ये अजून कोठेही नोंदवले गेले नाही.'' असेही ते म्हणाले.

Can a person be infected with Omicron twice?
कोरोनामुळे गर्भपात होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

परंतु, काही पाश्चात्य तज्ञांनी असा युक्तिवाद केला आहे की, ओमिक्रॉन पुन्हा होऊ शकतो.

"होय, तुम्हाला ओमिक्रॉन दोनदा संसर्ग होऊ शकतो," असे रटगर्स न्यू जर्सी मेडिकल स्कूलचे प्राध्यापक स्टॅनले वेस यांनी एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

"ओमिक्रॉनशी संबंधित डेटा विशेषत: नुकताच समोर येत आहे, परंतु या संदर्भात ओमिक्रॉन मागील प्रकारांपेक्षा वेगळे आहे असे समजण्याचे कोणतेही कारण नाही", असे व्हँडरबिल्ट युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे प्राध्यापक विल्यम शॅफनर यांनी अहवालात सांगितले आहे.

पण, ट्रिनिटी कॉलेज डब्लिन येथील प्रायोगिक इम्यूनोलॉजीचे प्राध्यापक किंग्स्टन मिल्स म्हणाले की, हे लोकांसाठी खूप लवकर विषाणूची लागण झाली आणि मग पुन्हा संक्रमित झाले. सहा महिन्यांच्या कालावधीत हे चित्र स्पष्ट होऊ शकते, असे मिल्सने फायनान्शियल टाईम्सला सांगितले.

Can a person be infected with Omicron twice?
Covid 19 सेल्फ टेस्टिंग किट किती विश्वासार्ह? जाणून घ्या डॉक्टरांचे मत

महाशूर म्हणाले की, ''भारतात कोविड री-इन्फेक्शनची प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि विशेषत: कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये.

"हे रोखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे कोविड प्रादुर्भाव टाळण्याच्या नियमांचे पालन करणे. कारण व्हायरस आहे की नाही, हे कळण्याचा कोणताही मार्ग नाही. विषाणू असू शकतो, परंतु रुग्ण लक्षणे नसलेला असू शकतो. त्यामुळे त्याला प्रतिबंध करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लस घेणे, मास्क घालणे, हात व्यवस्थित धुणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे हे आहे,” असेही महाशूर यांनी IANS ला सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()