कोरोनामुळे गर्भपात होऊ शकतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Pregnant Women
Pregnant Women File Photo
Updated on

काही तज्ज्ञांच्या मतानुसार, कोविड-19 मुळे गर्भवती महिलांमध्ये अनेक गुंतागुंत होऊ शकतात आणि लवकर गर्भपात होणे हे त्यापैकी एक असू शकते,

गर्भपात म्हणजे २० आठवड्यांपूर्वीच अचानकपण गर्भधारणेचे नुकसान होते. बहूतेक गर्भपात १२ व्या आठवड्यामध्ये होतात. योनीतून स्त्राव किंवा रक्तस्त्राव, ओटीपोटात किंवा पाठीच्या खालच्या भागात वेदना किंवा क्रॅम्पिंग आणि योनीतून द्रव किंवा ऊतक ( Tissue)बाहेर येणे अशी लक्षणे दिसू येतात.

Pregnant Women
केस कापल्यावर रक्त का येत नाही? घामाला दुर्गंध कसा येतो?

"अभ्यासात असे दिसून आले आहे की, SARS-Cov 2 विषाणू शरीरातील विविध अवयवांना जोडला जातो. यामध्ये SARS Cov ACE2 प्रथिने लवकर प्लेसेंटल टिश्यू देखील समाविष्ट आहे, म्हणूनच, लवकर गर्भधारणा कोविड संसर्गाच्या प्रभावांना संवेदनाक्षम बनवते," डॉ. मुस्कान छाब्रा, सल्लागार, बिर्ला फर्टिलिटी आणि आयव्हीएफ यांनी एचटी(HT) डिजिटलला सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, ''कोविड-19 शी संबंधित cytokine stormचा गर्भाच्या विकासावर(fetal developmentः आणि भ्रूण रोपणावरही (implanting embryo)हानिकारक परिणाम होऊ शकतो.''

पीएलओएस वन या वैज्ञानिक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की, कोविडमुळे नाळेची आग (placental inflammation)होऊ शकते ज्यामुळे गर्भाची वाढ मंदावते आणि गर्भपात होऊ शकतो.

"SARS-CoV-2 ची लागण झालेल्या गर्भवती महिलांमध्ये गर्भपात होण्याचा धोका वाढतो, जे अनेक केस रिपोर्ट्स आणि केस सिरीजमध्ये कोरोना साथीच्या आजारादरम्यान दिसून आले आहे,"

Pregnant Women
कोरोना काळात प्या 'हे' ज्यूस, भरपूर रोगप्रतिकारक शक्ती मिळेल

कोविड-19 मुळे गर्भवती महिला आणि रुग्णालयात दाखल होण्याचा धोका (Pregnant women and risk of hospitalization due to Covid-19)

अमेरिकन जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजीने प्रकाशित केलेल्या संशोधनानुसार, गर्भवती महिलांनाना कोविड-19 मुळे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता तिप्पट असते आणि हा आजार इतरांच्या तुलनेत त्यांच्यासाठी अधिक गंभीर असू शकतो.

प्राणघातक विषाणूमुळे गर्भधारणेच्या शेवटीच्या काळात कोरोना संसर्ग झालेल्या महिलांमध्ये बाळाच्या जन्म-संबंधित गुंतागुंत देखील होऊ शकते.पण, हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की यासंबंधी दिल्ले सल्ले अजूनही विकसित होत आहेत आणि जरी काही छोटी प्रकरणे(cases) अस्तित्वात आहेत, तरीही कोविड 19 आणि गर्भपात यांच्यातील संबंध स्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभ्यास करणे आवश्यक आहे," असेही डॉ छाबरा यांनी सांगितले.

प्रतिष्ठित वैद्यकीय जर्नल द लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात महामारी-संबंधित निर्बंधांमुळे गर्भवती महिलांवर कोविड-19 च्या अप्रत्यक्ष परिणामाची चर्चा केली आहे.

"कोविड-19 काळात असलेल्या गरोदर महिलांचे सामान्यतः चांगले गर्भधारणेचे परिणाम दिसून येतात. तथापि, कोविड-19 चे अप्रत्यक्ष परिणाम लक्षणीय असून, त्यात मृत अर्भकाच्यां जन्माचा वाढीव दरांचा समावेश आहे. कोविड-19 चे प्रसूतिपूर्व अप्रत्यक्ष परिणाम मोठ्या प्रमाणावर साथीच्या रोगाशी संबंधित व्यत्ययांमुळे होतात ज्यामध्ये पुनरुत्पादकreproductive, माता(maternal), नवजात (newborn)आणि बाळ आरोग्य सेवा आणि लॉकडाउन धोरणांचा परिणाम समाविष्ट आहेत. "द लॅन्सेट अहवाल वाचा.

Pregnant Women
Omicron: तुमचं मुलं कोरोना पॉझिटिव्ह झाले तर काय करावे?

Covid-19 च्या काळात गर्भवती महिला कशी काळजी घेऊ शकतात (How pregnant women can take care in times of Covid-19)

तज्ञ मतानुसार, कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी दोन्ही लसीकरणाचे डोस घेणे आणि सामाजिक अंतराचे नियम पाळणे महत्वाचे आहे.

व्यायाम, चालणे, ध्यान यासारख्या आरोग्यदायी हलाचालींचा सल्ला दिला आहे ज्यामुळे तुमचा तणाव दूर होण्यास मदत होईल.

"दर त्रैमासिकांमध्ये आहार आणि पोषणविषयक सल्ले तुमच्या आहारतज्ञांकडून घेतले पाहिजेत. संतुलित आहाराचे पालन करणे आणि जंक फूड टाळला पाहिजे. मद्यपान किंवा धूम्रपान करण्यापासून दूर राहणे आणि नियमितपणे पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करणे चांगले आहे," असे डॉ छाबरा म्हणतात.

कोणत्याही अंतर्निहित क्रॉनिक कंडीनशमध्ये बाबतीत, डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांचे पालन करण्याचा सल्ला दिला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()