Cancer Patients: कॅन्सर कमी वयाच्या लोकांनाही घेतोय आपल्या विळख्यात; अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

२०३० पर्यंत कॅन्सरच्या रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ होण्याचा अंदाज बांधण्यात येत आहे.
Cancer
Cancer Sakal
Updated on

भारतासह जगभरात कॅन्सरला युवक बळी ठरत आहेत. ब्रिटनमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासाच्या आधारे असा दावा केला जात आहे की ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण वेगाने वाढत आहे. तसंच गेल्या ३० वर्षांमध्ये कॅन्सरच्या रुग्णसंख्येमध्ये ७९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

हा अभ्यास भारतासह २०४ देशांवर आणि २९ प्रकारच्या कॅन्सरसंदर्भात ग्लोबल बर्डन ऑफ डिसिज या संस्थेने केला आहे. या अभ्यासातून सर्वच देशातल्या कॅन्सर रुग्णांची संख्या आणि कॅन्सर होण्याची कारणं याबद्दल विश्लेषण करण्यात आलं आहे.

Cancer
Cancer Diagnosis : कॅन्सरचे निदान आता होणार अचूक; व्हीएनआयटीत ‘फोटो अकॉस्टिक इमेजिंग’ तंत्रज्ञान विकसित

या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की १९९० मध्ये ५० वर्षांहून कमी वय असलेले १८ लाख लोक कॅन्सरपीडित होते. हा आकडा २०१९ मध्ये ३३ लाखांच्या आसपास आहे. म्हणजेच २०१९ मध्ये ३२ लाख ६० हजार असे कॅन्सर रुग्ण होते ज्यांचं वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे. रुग्णसंख्येत २८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

या अभ्यासात असं आढळून आलं आहे की २०१९ मध्ये ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांमध्ये अगदी सुरुवातीच्या स्टेजमधला स्तनांचा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त होतं. पण १९९० च्या नंतर नाकाच्या आणि प्रोस्टेटच्या कॅन्सरचं प्रमाण झपाट्याने वाढलं. १९९० आणि २०१९ या काळामध्ये नाकाचा आणि प्रोस्टेटचा कॅन्सर यांच्या प्रमाणामध्ये दरवर्षी २.२८ आणि २.२३ टक्के अनुक्रमे अशी वाढ नोंदवण्यात आली.

Cancer
Cancer Patients: कॅन्सरचा बळी ठरतायत पन्नाशीच्या आतले लोक; येत्या १० वर्षांत...; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

या काळामध्ये लिव्हर कॅन्सरच्या प्रमाणात २.८८ टक्के इतकी घट झाली आहे. याचं कारण म्हणजे लसीकरण. अनेक तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये चाचण्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे हे कॅन्सरची रुग्णसंख्या आढळून येत आहे. संशोधकांचं असं अनुमान आहे की २०३० पर्यंत ५० वर्षांखालील लोकांमध्ये कॅन्सर होण्याचं प्रमाण ३१ टक्क्यांपर्यंत वाढू शकतं.

मृत्यूचं प्रमाण किती?

गेल्या तीन दशकांच्या अभ्यासावरुन संशोधकांनी असा अंदाज बांधला आहे की जगभरात सुरुवातीच्या स्टेजचे कॅन्सर रुग्ण आणि कॅन्सरमुळे होणारे मृत्यू यांच्या प्रमाणामध्ये अनुक्रमे ३१ आणि २१ टक्के वाढ होऊ शकते. येणाऱ्या ७ वर्षांमध्ये म्हणजे २०३० पर्यंत ४० वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना कॅन्सरचा धोका अधिक असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.