Cancer Vaccine : खुशखबर! कॅन्सरचा धोका टळला; डॉक्टरांनी शोधल वॅक्सिन

मुळात कॅन्सर हा पेशींच्या असंतुलनामुळे वाढतो
Cancer Vaccine
Cancer Vaccineesakal
Updated on

Cancer Vaccine : कॅन्सर होण्याची शक्यता वाढली आहे, जगात त्याच्या रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढते आहे आणि लोकांमध्ये त्याची भीतीही, पण आता घाबरण्याच काही कारण नाही. कारण शास्त्रज्ञांनी नवीन वॅक्सिन शोधल आहे. ज्यामुळे आता कॅन्सर बराच आटोक्यात आणला जाऊ शकतो.

Cancer Vaccine
Blood Cancer Symptoms: तुमच्या चेहऱ्यावर दिसतात ब्लड कॅन्सरची ही लक्षणे; पुरळ समजून दुर्लक्ष करू नका

लंडनच्या एका संघटनेतर्फे कॅन्सरच वॅक्सिन विकसित करण्यात आलेलं असून त्यांनी असा दावा केला आहे की, त्यानंतर या धोकादायक आजारामुळे होणारे मृत्यू तब्बल 44 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. 157 कॅन्सर ग्रस्त लोकांवर हिची चाचणी करण्यात आली. हे सर्व लोकं मेलेनोमा कॅन्सरच्या तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यात होते आणि त्यांची उपचारानंतर गाठ सर्जरीकरून काढण्यात आली.

Cancer Vaccine
Winter Recipe : हिवाळ्यात पारंपरिक पध्दतीने हरभऱ्याची भाजी कशी तयार करायची?

संशोधकांच्या आकडेवारीनुसार, यूकेमध्ये दरवर्षी 36 पुरुष आणि 47 महिलांना त्यांच्या आयुष्यात कधीतरी त्वचेचा कॅन्सर झाल्याची धक्कादायक बाब जाणवली आहे. कीट्रूडा हा मेलेनोमा, फुफ्फुसाचा कॅन्सर आणि डोके आणि मानेच्या कॅन्सर उपचार करण्यासाठी वापरला जातो. याचाच वापर या वॅक्सिनमध्ये केला आहे. डॉक्टरांच्या मते, हे नवीन वॅक्सिन खूप प्रभावी असल्याच म्हटलं जात आहे.

Cancer Vaccine
Palak Paneer Recipe : या पाच सोप्या स्टेप्सने बनवा हॉटेल स्टाइल पालक पनीर रेसिपी!

नक्की कोणतं तंत्रज्ञान वापरलं आहे?

ही स्टडी संपूर्ण कॅन्सरच्या रोगांसाठी न करता छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये केली गेली. जसे की स्किन कॅन्सर मध्ये हे वॅक्सिन खूप प्रभावी आहे. याचा मुळ उद्देश रोगप्रतिकारक शक्ति देणाऱ्या पेशी वाढवणे आहे. यासाठी त्यांनी mRNA-4157/V940 हे घटक तयार केल आहे.

Cancer Vaccine
Prostate Cancer : पुरुषांनी करावीत ही योगासने; प्रोस्टेट कॅन्सरचा धोका होईल कमी

सध्या हे संशोधन पहिल्या टप्प्यात आहे. पण हे सक्रिय होऊ शकतं यावर शास्त्रज्ञांच म्हणणं आहे. या लसीमूळे डॉक्टर खुश आहेत, मुळात कॅन्सर हा पेशींच्या असंतुलनामुळे वाढत असल्याने हे वॅक्सिन त्याच्या मुळांवरच घाव घालत रोग्यांना बरं करू शकतं. त्यामुळे या वॅक्सिनची बरीच चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.