- डॉ. मालविका तांबे
एप्रिल-मे आले की फिरायला कुठे जायचे ही चर्चा प्रत्येकाच्या घरात सुरू होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळ्यांची पहिली पसंती थंड व बर्फाच्या जागेलाच असते, मग ती आपल्या देशातील असो वा परदेशातील. या सगळ्यांत जास्ती कुचंबणा होते ती शरीराची. शरीराची तयारी असते की ऋतुसंधी सुरू झालेली आहे तेव्हा थंडीकडून उष्णतेकडे जायची तयारी सुरू करावी.
शरीराची अशी तयारी सुरू असतानाच त्याला मध्येच पुन्हा थंडीची सामना करावा लागतो. एवढेच नव्हे तर सहलीला गेले की जेवणातील सर्व पदार्थही बदलतात, उठण्याच्या, झोपण्याच्या वेळा बदलतात. यामुळे बऱ्याच वेळी सुट्टीत किंवा सुट्टीनंतरचा वेळ आजारपणात जातो असे दिसते. तर याकरता आपल्याला काय काळजी घ्यायला हवी याबद्दल आपण माहिती करून घेऊ.
1) शरीराचे तापमान : आपण सगळे गरम रक्ताचे प्राणी आहोत, अर्थात आपल्या शरीराचे तापमान स्थिर ठेवणे खूप गरजेचे असते. त्यामुळे ठिकाण थंड आहे की गरम आहे त्यादृष्टीने कपड्यांची व्यवस्था करणे गरजेचे असते. लोकांना वाटते की आपण थंड ठिकाणी आलो आहोत तेव्हा मस्त थंडगार वाटले पाहिजे, त्या दृष्टीने गरम कपडे घालणे टाळले जाते.
पण असे करणे योग्य नाही. शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी शक्ती वाया घालवावी लागली तर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. उन्हाळ्याच्या दिवसांत थंड प्रदेशी जाताना टोपी, मफलर, जॅकेट अशा सगळ्या गोष्टी नेणे इष्ट असते. विमानाच्या प्रवासातही कपडे जेवढे उबदार घातलेले असतील तेवढी तब्येत नीट राहायाला मदत मिळते.
2) हायड्रेशन : सहलीला गेले की पाणी पिणे विसरायला होते, कधी निघायची घाई असते, कधी बरोबर पाण्याची बाटली न्यायला विसरलेली असते, कधी जेथे गेलो त्याठिकणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसते. अशा विविध करणामुळे पाणी कमी प्यायले जाते व त्यामुळे लघवीशी संबंधित, अपचनाचे त्रास, पोट साफ न होणे वा ॲसिडिटीची तक्रार होताना दिसते.
त्यामुळे पाणी व्यवस्थित नियमाने पिणे आवश्यक आहे. तसेच सहलीला गेले असताना आपल्याबरोबर जिरे पूड व खडीसाखर घेऊन जावे. लघवीचा त्रास त्रास वाटला तर यातील अर्धा चमचा मिश्रण कोमट वा सामान्य तापमानाच्या पाण्याबरोबर घेतले तर फरक पडू शकतो.
अपचन होत असल्यास आले-लिंबू-मध यांचे मिश्रण काचेच्या बाटलीत भरून घेऊन जावे, कुठल्याही प्रकारचा अपचनाचा त्रास होत असला तर हे औषध उत्तम असतेच, पण क्वचित आपल्याबरोबर असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीला हृदयाशी संबंधित त्रास सुरू झाला तर दवाखान्यात जाण्याबरोबरच यातील अर्धा चमचा मिश्रण पटकन देता येते कारण मध न आले हृद्य असतात.
3) आहाराची काळजी : सहलीला गेले की खाण्या-पिण्याच्या नियमांचे पालन करणे अवघड जाते. जेवणाच्या वेळा तर मुळीचच पाळल्या जात नाहीत, त्यासाठी आपल्या प्रथमोपचार बॉक्समध्ये संतुलन अन्नयोग व संतुलन पित्तशांतीसारख्या गोळ्या नक्की ठेवाव्यात. प्रत्येक जेवणानंतर या गोळ्या घेतल्या तर जेवणात फार मसालेदार वा तिखट पदार्थ खाण्यात आला तरी त्रास होत नाही.
रात्री झोपताना सॅनकूल चूर्ण नियमाने घेतल्यास पचन नीट राहायला मदत मिळते व रोज वेळच्यावेळी पोट साफ होऊन जाते. आम्ही तर गाडीच्या किटमध्ये या तिन्ही गोष्टी नक्की ठेवतो. यामुळे चुकून बाहेर काही खाण्याची वेळ आली तरी त्रास होत नाही.
4) दुखणे किंवा अपघात : बऱ्याच लोकांना नियमित व्यायामाची सवय नसते, पण सहलीला गेल्यावर रोज सकाळ ते संध्याकाळ वेगवेगळी ठिकाणे पाहण्याच्या निमित्ताने पायपीट होते. संध्याकाळी परत आल्यावर गुडघे, पाय, मान दुखणे वगैरे त्रास होताना दिसतात.
स्नायूंना व सांध्यांना मदत करण्यासाठी संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेल व संतुलन शांती सिद्ध तेलाचा वापर करता येतो. रोज संध्याकाळी पायांना खालून वर या दिशेत वा जेथील स्नायू दुखत असतील तेथे हलक्या हाताने जिरवले आणि सांधे दुखत असतील वा नसतील तरी संतुलन शांती सिद्ध तेल लावल्याने व पाठ-मानेला संतुलन कुंडलिनी तेल लावण्याने दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुखकर होतो.
याचबरोबरीने सांधेदुखी जाणवली किंवा स्टिफनेस जाणवला तर संतुलन वातबल घेण्याचा फायदा होतो. सहलीला गेल्यावर काहीतरी लागणे, जखम होणे, रक्त येणे स्वाभाविक असते, अशा वेळी संतुलनच सॅन हील मलम लावल्याचा उपयोग होतो. संतुलनशी जोडलेला परिवार एकदा फिरायला गेला होता.
रात्री १२ वाजता फटाके फोडत असताना मुलीच्या चेहऱ्यावर फटाका फुटला, अनोळखी ठिकाणी कुठल्या डॉक्टरांकडे जाणार? सुदैवाने डोळे, नाक वगैरे ठिकाणी जखमा झालेल्या नव्हत्या. तिच्या आईने चेहऱ्यावर सॅन हील मलम लावले, दुसऱ्या दिवशी डॉकटरांना शोधून तेथे जाईपर्यंत त्वचा बऱ्यापैकी सुधारलेली होती. ८-१० तासांत त्वचा एवढी सुधारलेली पाहून डॉक्टरांनाही आश्र्चर्य वाटले.
5) सहलीच्या वेळी अनेकांना जाणवणारा एक त्रास म्हणजे मूळव्याध दुखणे किंवा रक्त येणे. आहार चुकीचा होत असल्याने तसे पोट साफ होत नसल्यामुळे हा त्रास प्रवासात हमखास जाणवतो. यासाठी रोज रात्री सॅनकूल घेणे उत्तम ठरते. बरोबरीने संतुलन अर्शना गोळी घेणे व गुदभागी संतुलन पादाभ्यंग घृत किंवा व्रणरोपण तेल लावणे मदत करते.
6) लहान मुलांना सहलीच्या वेळी वरचेवर पोटदुखीचा त्रास होतो. अर्थात कारणानुसार औषध देणे उत्तमच पण संतुलन रोझ ब्युटी सिद्ध तेलासारखे तेल वरचेवर हलक्या हाताने पोटावर लावत राहिले तर अशा प्रकारचा त्रास कमी होताना दिसतो. गॅसेस वगैरे झालेले असल्यास तेही कमी व्हायला मदत मिळते.
7) सहलीदरम्यान चहा पिताना त्यात आले घालण्याचा आग्रह करावा. खूप जास्त दूध घालून आटवून केलेला चहा पिण्यापक्षा कमी दुधाचा व आले घातलेला चहा प्यायला तर शरीरात रक्तसंवहन व्यवस्थित व्हायला व पचन नीट व्हायला मदत मिळते.
8) खाण्यापिण्यात चुका होत असल्याने किंवा निःसत्त्व अन्न खाण्यात आल्यामुळे सहलीच्या शेवटच्या टप्प्यात बरीच मंडळी थकलेली दिसतात. अशा वेळी च्यवनप्राश, धात्री रसायन, मॅरोसॅन, शतानंत कल्प वगैरैंतील कुठलेतरी रसायन सहलीदरम्यान घेत राहिल्यास फायदा होताना दिसतो. थकवा आल्यावर रसायन घेणे सुरू करण्यापेक्षा रोज नियमाने रसायन घेत राहणे जास्त उत्तम ठरते.
9) कुठलाही व्यायाम रोज घरी करण्याची सवय असली तर सहलीदरम्यान व्यायाम न करण्यानेही थकवा येतो. रोज ५-१० मिनिटे प्राणायाम करणे, थोड्या फार प्रमाणात व्यायाम करणे व चालणे हे सुद्धा सहलीत उत्साह टिकून राहायला मदत करू शकेल.
10) त्वचेची काळजी घेण्याच्या दृष्टाने संतुलन बॉडी सूदिंग क्रीम, क्रेम रोझ वापरणे तसेच केसांच्या स्वास्थ्यासाठी संतुलन व्हिलेज हेअर क्रीम वापरणे प्रवासादरम्यान उत्तम ठरते.
11) औषधांचे महत्त्व : सहलीवर गेल्यावर बरेच जण आपली नेहमीची औषधे घेण्याचे विसरतात. औषधे नियमितपणे घेतली तरच त्यांचा फायदा होतो. मधुमेह, रक्तदाब वगैरे आजारांमध्ये औषध घेणे विसरले तर नुकसान होते. त्यामुळे आपली नेहमीचा औषधे एखाद्या पाऊचमध्ये दिवसाप्रमाणे नियोजन करून घेऊन जावीत. सर्दी-खोकला-जुलाब वगैरेंसाठी लागणारी आयुर्वेदिक औषधे बरोबर नेण्याचा फायदा होऊ शकतो. लहान मुले बरोबर असली तर आम्ही संतुलन सीतोपलादी चूर्ण व संतुलनचे ब्राँकोसॅन सिरप प्रवासात नक्की घेऊन जायला सांगतो.
12) झोप व शांतता : सहलीला गेल्यावर उशिरा झोपणे व लवकर उठणे हे बऱ्याचदा टाळता येत नाही. सहलीला आपली चादर व पांघरूण नेणे उत्तम असते. नेहमीच्या अंथरुण-पांघरुणात लवकर झोप लागायला मदत मिळते. जमत असल्यास झोपण्यापूर्वी संतुलन प्युरिफायर धूप वा वरशिप धूप करणे उत्तम. याच बरोबरीने संतुलन ब्रह्मलीन तेल लावले, निद्रासॅन गोळ्या बरोबर घेतल्या की वेळेत व्यवस्थित झोप होऊन दुसऱ्या दिवशी उठल्यावर ताजेतवाने वाटू शकते. सहलीला गेले असता संध्याकाळी व रात्री थोडा मोकळा वेळ मिळू शकतो, अशा वेळी पादाभ्यंग घृत वापरून पादाभ्यंग केल्याचा फायदा मिळू शकेल.
13) आयुर्वेदाच्या मतानुसार प्रवासामुळे वाताची वृद्धी होत असते ती कमी करण्यासाठी आपण काही छोट्या छोट्या टिप्सचे पालन करू शकतो.
शक्य असल्यास कानामध्ये कापसाचे बोळे घालणे उत्तम.
खिडकीजवळ बसले असल्यास वाऱ्याचा झोत सरळ अंगावर येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
एसीचा वारा सरळ अंगावर येणार नाही याकडे लक्ष द्यावे.
शक्यतो एसी २४ ते २५ डिग्रीवर ठेवणे उत्तम.
पायांमध्ये सुती मोजे घालणे सर्वांत उत्तम.
बसताना पाय अवघडणार नाही अशा स्थितीत बसावे, तसेच गुडघ्यांवर जोर येणार नाही याची खबरदारी घ्यावी.
पाय क्रॉस करून बसणे किंवा वेडेवाकडे ठेवून बसणे यामुळेही शरीरात वात वाढू शकतो.
गाडीने प्रवास करत असल्यास थोड्या उश्या घेऊन जाव्या, जेणेकरून बसण्याची स्थिती आरामदायक करण्यास मदत मिळेल.
अशा प्रकारे सहलीला गेल्याचा ठिकाणाचा, ऋतूचा, तापमानाचा व आपल्या वयाचा विचार करून थोडी आयुर्वेदिक मदत बरोबर नेली तर सहलीचा आनंदही घेता येईल व घरी आल्यावर उत्साह व ताकद टिकून राहून पुन्हा जोमाने काम सुरू करायला मदत मिळू शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.