Carrot Chia Pudding Recipe : गोडही अन् हेल्दीही! आहारात करा या पुडिंगचा समावेश, कोलेस्ट्रॉलसोबतच बद्धकोष्ठतेपासून मिळेल आराम

गोड खाऊनही आरोग्याला होईल फायदा; आहारात करा या पुडिंगचा समावेश!
Carrot Chia Pudding
Carrot Chia Pudding sakal
Updated on

जर तुम्ही योग्य जीवनशैलीचे पालन केले तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पण आजकाल खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे प्रत्येकामध्ये दोन आजार दिसून येत आहेत. बद्धकोष्ठता आणि वाढते कोलेस्ट्रॉल. जर तुम्हीही या दोन समस्यांनी त्रस्त असाल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खास प्रकारचे पुडिंग खाऊन आराम मिळवू शकता.

गाजर-चिया सीड्सचे पुडिंग कोलेस्ट्रॉल आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.

चिया सीड्स आणि गाजरचे पुडिंग हे पोषक तत्वांचा खजिना आहे. चिया सीड्स आतड्यांमध्ये चांगले बॅक्टेरिया वाढवण्यास देखील मदत करतात. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते.

Carrot Chia Pudding
Besan Cutlet Recipe : नाश्त्यासाठी बनवा गरमा गरम ‘बेसनाचे कटलेट’, अगदी सोपी आहे पद्धत, जाणून घ्या रेसिपी

लागणारे साहित्य

  • चिया सीड्स - 2 चमचे

  • लो फॅट मिल्क - एक कप

  • किसलेलं गाजर - 1 कप

  • ब्राऊन शुगर - 1 टीस्पून

  • एक चमचा तूप

  • बारीक केलेले बदाम

चिया सीड्स आणि गाजराचे पुडिंग कसे बनवायचे

एक कप लो फॅट दुधात चिया सीड्स रात्रभर भिजत ठेवा.

आता सर्व प्रथम गाजर धुवून स्वच्छ करा.

आता एक तवा घ्या आणि त्यात एक चमचा तूप घाला.

त्यात किसलेले गाजर घालून मिक्स करा.

त्यात एक चमचा ब्राऊन शुगर घाला.

आता भिजवलेल्या चिया सीड्समध्ये गाजर घाला.

वर किसलेले बदाम टाकून आनंद घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()