Vishanu Yudh Abhyas in Ajmer : भविष्यातील विषाणू संसर्गाच्या उद्रेकाला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने युद्धपातळीवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात २७ ते ३१ ऑगस्ट या काळामध्ये ‘विषाणू युद्ध अभ्यास’ ही रंगीत तालीम आयोजित करण्यात आली होती.
‘नॅशनल वन हेल्थ मिशन’ च्या (एनओएचएम) नेतृत्वाखाली या मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. या मॉक ड्रीलच्या माध्यमातून राष्ट्रीय संयुक्त आपत्ती प्रतिसाद कृती दलाची (एनजेओआरटी) तयारी आणि त्याच्या क्षमतेचा आढावा घेण्यात आला. या मॉक ड्रीलमध्ये आरोग्यतज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञ सहभागी झाले होते असे आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे.
अनेकदा प्राण्यांकडून माणसाला विषाणूचा संसर्ग होतो त्यामुळे देखील जागतिक साथ येण्याचा धोका असतो असे आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा यांनी या मोहिमेचे कौतुक केले. तसेच भविष्यातील आपत्कालिन परिस्थितीसाठी भारत सज्ज असल्याचे मत व्यक्त केले.
नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी)
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)
वैद्यकीय सेवा महासंचालनालय (डीजीएचएस)
पशुकल्याण आणि दुग्धोत्पादन विभाग (डीएएचडी)
वन आणि पर्यावरण मंत्रालय
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएएआर)
या मॉकड्रीलमध्ये प्रामुख्याने दोन घटकांचा विचार करण्यात आला होता. उद्रेकासाठी कारणीभूत असलेल्या विषाणूची ओळख पटविणे आणि आजारी पडणाऱ्या प्राणी आणि माणसांची संख्या नियंत्रित ठेवणे या दोन गोष्टी केंद्रस्थानी ठेवून या मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते असे आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.