Chakki Chalanasana: पोटाची चरबी घटवण्यास फायदेशीर आहे चक्की चलनासन, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

चक्की चलनासन हा एक अतिशय चांगला योग आहे, ज्याच्या रोजच्या सरावाने पोट आणि कंबरेची चरबी कमी होते.
Chakki Chalanasana
Chakki Chalanasanasakal
Updated on

चक्की चलनासन योग हे नाव संस्कृतमधून आले आहे ज्यात "चक्की" म्हणजे "चक्की किंवा दळणे", आणि "चलना" म्हणजे "मंथन किंवा चालवणे". हे आसन करताना आपण गिरणी चालवत असल्याचा भास होतो. 

आजही शहराच्या तुलनेत खेड्यातील स्त्रीया अधिक फिट आहेत. याला कारणीभूत आहे खेड्यातील राहणीमान, जेवण आणि शेतीची, गुराढोरांची कामे. खेड्यात आजही प्रत्येक काम घरातच केले जावे यावर भर दिला जातो. दळण दळण्यासाठी जात्याचा वापर केला जातो. तर, पाणी भरण्यासाठी विहीरीचा मोट ओढला जातो. या कामांमूळेच, तेथील स्त्रीया अधिक तंदुरूस्त आहेत. आज आपण अशाच एका योगासनाबद्दल जाणून घेऊयात...

Chakki Chalanasana
Health Care: साष्टांग नमस्कार करण्याचे फायदे माहिती आहेत का? जाणून घ्या

या योगाला चक्कीचलनासन योग असे म्हणतात. याला 'Churning the Mill Yoga Pose' असेही म्हणतात. हे आसन अनेक समस्यांपासून बचाव करते.

कसे करावे हे आसन

  • हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय पुढे ठेऊन चटईवर बसा.

  • दोन्ही पाय एकमेकांपासून लांब पसरा.

  • दोन्ही हातांची बोटे गुंफून हात जोडा.

  • श्वास घेताना, तुमच्या शरीराचा वरचा भाग पुढे आणा. पाय झाकून हाताने मोठे वर्तुळ बनवा.

  • पुढे वाकताना श्वास घ्या आणि मागे येताना श्वास सोडा.

  • 10 वेळा सरळ दिशा तर उलट दिशेने 10 वेळा हात गोल फिरवा.

या आसनाचे फायदे

पोटाची चरबी लवकर कमी करण्यासाठी, तसेच स्त्रियांच्या गर्भाशयाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी उपयुक्त असे आसन आहे. हे नियमित केल्याने मासिक पाळीमध्ये होणारी पोटदुखी थांबते. हात, पाय दुखणे थांबते. तसेच मणक्यातील हाडे लवचिक होऊन कंबरदुखी थांबते. वय लपवण्यातही हे आसन फायदेशीर ठरते. तुम्हाला झोप लागत नसेल तर त्यातही हे आसन फायदेशीर आहे. चक्कीचलनासन योगामुळे मन शांत आणि स्टेबल राहण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.