Chickenpox Clade 9 Symptoms : चिकन पॉक्सचा नवा व्हेरिएंट लहान मुलांना करतोय टार्गेट, असा करा बचाव

नव्या व्हेरिएंटचा शोध इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी लावलाय.
Chickenpox Clade 9 Symptoms
Chickenpox Clade 9 Symptoms esakal
Updated on

Chickenpox Clade 9 Symptoms : भारतात अलीकडेच चिकपॉक्सच्या (कांजण्या) नव्या व्हेरिएंटचा शोध लागलाय. ज्याचा प्रसार वेगाने होत असल्याचे दिसून येतेये. या व्हेरिएंटला क्लॅड-9 नावाने ओळखलं जातं. हा व्हेरिएंट गंभीर असल्याचे सांगितले जातेय. तेव्हा तज्ज्ञांनी या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.

नव्या व्हेरिएंटचा शोध इंस्टीट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी लावलाय. चिंतेची बाब म्हणजे भारताची लोकसंख्या अब्जामध्ये असून कांजण्या या आजाराचा दर अधिक असल्याचे दिसून आले.

क्लॅड 9 वर उपाय

चिंतेचा विषय म्हणजे क्लॅड 9 या आजारावर विशेष उपाय नाही. कांजण्या हा संसर्गजन्य आजार आहे जो व्हॅरिसेला-जोस्टर व्हायरसमुळे होतो.

क्लॅड 9 ची लक्षणे

क्लॅड 9 चा संसर्ग झाल्यास ताप, अंगावर दाणे, खाज येणारे फोड, डोकेदुखी, खोकला, गळ्यात खवखवणे, थकवा यांसारखी लक्षणे दिसून येतात.

Chickenpox Clade 9 Symptoms
H3N2 variant : कोरोनानंतर कर्नाटकमध्ये नवा संसर्ग! राज्य सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

क्लॅड 9 मुळे होणारे नुकसान

या व्हेरिएंटमुळे रूग्णांवर खाज येणारे फोड, पाणी भरलेले दाणेदार फोड छातीवर, पाठीवर आणि चेहऱ्यावर दिसून येतात. हे दाणेदार फोड शरीराच्या अन्य भागांवरही पसरू शकतात. ज्यामुळे कावीळ, एन्सेफलायटिस स्किन इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं.

लहान मुलांसाठी हा संसर्ग धोक्याचा

कांजण्यांचा संसर्ग १-२ दिवसांत अधिक संक्रमक होतो. मुलांमध्ये याची हलकी लक्षणं दिसून येतात तर वयोवृद्धांमध्ये याची गंभीर लक्षणं दिसून येतात.

Chickenpox Clade 9 Symptoms
तुमच्या त्वचेवर आलेल्या कांजण्या की Monkeypox? आता ओळखणं होणार सोपी

कांजण्यांच्या संसर्गापासून असा करा बचाव

कांजण्या झालेल्या रूग्णांपासून अंतर ठेवा. त्यांच्या अतिजवळ जाऊ नका. खोकलताना किंवा शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा. हातांना वारंवार साबणीने धुवा. आणि या रूग्णांच्या दैनंदिन वस्तू जसे की टॉवेल, भांडी वापरणे टाळा. (Health)

कांजण्या झाल्यास काय कराल?

कांजण्या झाल्यास भरपूर वेळ विश्रांती घ्या. वेदनांपासून सुटकेसाठी ओव्हर-द-काउंटर औषध घ्या. खाजेसाठी कॅलामाइन लोशन लावा. शरारीवर आलेल्या दाणेदार फोडांना स्वच्छ आणि कोरडे ठेवा. त्याला खाजवू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.