Child Care : लहान बाळाला AC/Cooler पुढे झोपवताना तुम्हीही करता का या 5 चुका, पडेल महागात

AC/Cooler पुढे झोपवताना पालकांनी टाळाव्यात या चुका
Child Care
Child Careesakal
Updated on

Child Care : उन्हाळ्यातील उकाळ्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच एसी, कूलरपुढे बसायला आवडतं. अति उन्हाळ्यात लहाना बाळांना चिडचिड होतं. त्यांची चिडचिड होऊ नये आणि त्यांना शांत झोप लागावी म्हणून पालक त्यांना एसी किंवा कूलरपुढे झोपतात. मात्र हे करत असताना बरेच पालक या ५ चुका करतात. त्या चुका कोणत्या आणि त्याचा बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो याबाबत आज सविस्तर जाणून घेऊयात.

रूम टेम्प्रेचर

तुम्ही बाळाला पहिल्यांदा एसी किंवा कूलरपुढे झोपवत असाल तर एसीचे टेम्प्रेचर २५-२८ दरम्यान असायला हवे. नवजात बाळाच्या रूमचं टेम्प्रेचर अतिथंड असू नये याची विशेष काळजी घ्यावी.

मुलांना कुठले कपडे घालावे

जर तुमचे बाळ एक महिन्यापेक्षाही लहान असेल तर त्याला एसीमध्ये झोपण्यापूर्वी चांगले झाकून ठेवा. त्यासाठी पातळ स्वेटर आणि डोक्यावर टोपी आणि मोजे घाला. परंतु जर तुमचे बाळ एका महिन्यापेक्षा मोठे असेल तर तुम्हाला त्याला इतके झाकण्याची गरज नाही.

एसी सुरु-बंद करावी

बाळाला एसीमधून दुसऱ्या रूममध्ये हलवताना लगेच आधी जिथे बाळ आहे त्या रूमची एसी बंद करून त्याला नॉर्मल रूम टेम्प्रेचरमध्ये येऊ द्या. त्यानंतर बाळाचे टेम्प्रेचर नॉर्मल होऊ द्या. त्यानंतर त्याला बाहेर घेऊन जा. बाळाला सतत एसीपुढे ठेवू नका. त्यामुळे त्याचे बॉडी टेम्प्रेचर कमी होऊ शकते. आणि बाळाची तब्येत बिघडू शकते. (Parents)

Child Care
Baby Care Tips : एक वर्षाच्या आतील बाळाला या गोष्टी कधीच चारू नका? होतील गंभीर आजार!

एसीची सरळ हवा येत असेल अशा ठिकाणी बाळाला ठेवू नका

बाळाला एसीमध्ये झोपवताना त्याला एसीची थेट हवा मिळणार नाही याची विशेष काळजी घ्या. जेव्हा असे होते तेव्हा मुलाला ताप किंवा सर्दी होण्याचा धोका असतो. बाळाला एसीमध्ये झोपवताना त्यावर हलकीशी चादर घाला. (baby care)

Child Care
Child Eye Care: तुमची मुलं देखील जवळून टीव्ही पाहतात? वेळीच घ्या काळजी नाहीतर या आजारांची शक्यता

डॉक्टरांचे मत

जर तुमचे मूल प्री-मॅच्युअर असेल, तर त्याला एसीमध्ये झोपवण्यापूर्वी त्याच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. याशिवाय, बाळाला एसीमध्ये झोपवण्यापूर्वी, त्याच्या नाजूक त्वचेवर मॉइश्चरायझर लावा जेणेकरून ते कोरडे होऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.