Tasty Milk Recipes: दूध पिण्यासाठी तुमची मुलं नाक मुरडतात, मग या टिप्सच्या मदतीने बनवा Tasty... मुलंदेखील होतील खुष

अनेक मूलं ही दूध दूधात एखादा फ्लेवर मिसळल्या शिवाय ते पितच नाहीत. बाजारामध्ये विविध फ्लेवरचे शिवाय मुलांच्या वाढीसाठी पोषक तत्व असल्याचा दावा करणारे प्राॅडक्ट मिळतात. मात्र यातील बहुतांश प्राॅडक्टमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं
tasty milk recipe for kids
tasty milk recipe for kidsEsakal
Updated on

Tasty Milk Recipe: दूध हे लहान मुलांच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचं असतं. दुधामध्ये कॅल्शियमसोबतच, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि इतर अनेक खनिजं उपलब्ध असतात. ही तत्वं मुलांच्या संपूर्ण विकासासाठी आणि वाढीसाठी गरजेची असतात. Child Care Tips How to make milk healthy and tasty

यासाठी दररोज मुलांनी एक ग्लास दूध Milk तरी पिणं आवश्यक आहे. असं असलं तरी अनेक मुलांना दूध आवडतं नाही. दूधाचं नाव घेताच ते नाक मुरडतात. काही मुलांना दूधाचा वास आवडत नाही तर काहींना चव Taste

अनेक मूलं ही दूध दूधात एखादा फ्लेवर मिसळल्या शिवाय ते पितच नाहीत. बाजारामध्ये विविध फ्लेवरचे शिवाय मुलांच्या वाढीसाठी पोषक तत्व असल्याचा दावा करणारे प्राॅडक्ट मिळतात. मात्र यातील बहुतांश प्राॅडक्टमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं. काही मुलं तर या पावडर टाकूनही दूध पिणं पसंत करत नाहीत.

यासाठीच दूधाला अधिक चवदार Tasty आणि हेल्दी बनवता आलं तर. खास करून लहान मुलांना पोषक आहार द्यायचा म्हंटलं तर त्यांच्या चवीची दखल घेणं गरजेचं असतं. काही ट्रीक वापरून आपण दूधाची चवही वाढेल आणि पोषणही मिळेल असे प्रयत्न नक्कीच करू शकतो. Make milk tasty for kids 

यासाठीच आज आम्ही तुम्हाला मुलांसाठी दूध अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक कसं करता येईल याचे पर्याय सांगणार आहोत. या दूधाच्या पर्यायामुले तुमची मुलं नक्कीच आवडीने ते दूध पिण्यास तयार होतील. 

हे देखिल वाचा-

tasty milk recipe for kids
Milk And Calcium: तुमच्या शरीराला लागणाऱ्या कॅल्शियमची गरज दूध पूर्ण करत का?

मिल्क शेक आणि स्मूदी- फळांच्या स्मूदी किंवा मिल्क शेकमुळे मुलांसाठी ते अधिक आवडीचं पेय ठरू शकतं. दूधासोबतच यामुळे फळांचा देखील आहारात समावेश होईल. यासाठी तुम्ही सिझनल फळांची निवड करू शकता. बाजारातील फ्रूट प्लप वापरण्याएवजी ताज्या फळांचा स्मूदीसाठी उपयोग करा. Healthy milk shake for kids 

केळी, सफरचंद, चिकू - ही साधारण संपूर्ण वर्षभरात मिळणारी फळं तुम्ही वापरू शकता. दूधासोबत तयार करण्यात आलेल्या या फ्रूट मिल्क शेकमुळे मुलांना पुरेसं पोषणही मिळेल. तसचं फळांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होईल.  तसचं त्यांच्यात जास्त वेळ एनर्जी राहील. 

सुकामेवा- दूधाची चव वाढवण्यासोबतच ते अधिक पोषक होण्यासाठी तुम्ही सुकामेवा वापरू शकता. बदाम, किशमिश, खजूर, अक्रोड, काजू आणि पिस्ता यांसारखे ड्रायफ्रूटची स्मूदी तुम्ही मुलांना देऊ शकता. त्याचसोबत सुकामेवाची घरात मिल्क मिस्क पावडर तयार करुन ठेऊ शकता. 

यासाठी तुम्हाला शक्य तितके ड्रायफ्रूट्स ज्यात बदाम, काजू, पिस्ता तव्यावर हलके गरम करावे. मिक्सरमध्ये या ड्रायफ्रूट्ससोबतच जायफळ आणि वेलची एकत्र वाटून घ्यावी. ही तयार पावडर एका बरणीत भरून ठेवावी. कोमट दूधात ही पावडर मिसळून मुलांना हे दूध दिल्यास ते नक्कीच आवडीने पितील. 

हळदीचं दूध- हळद आणि दूध एकत्रितपणे मुलांसाठी पोषक आहेत. सर्दी तसचं खोकल्यासाठी हळदीचं दूध उपयुक्त ठरतं. दूध आणि हळद दोन्हीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्याने सर्दी खोकल्याची समस्या दूर होते.

खास करून हिवाळा आणि पावसाळ्यात मुलांना आठवड्यातून दोनदा तरी हळदीचं दूध द्यावं. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासही मदत होते. Turmeric milk benefits 

खिरीच्या स्वरुपात दूध- अनेक मुलांना दूध हे त्याच्या वासामुळे किंवा चवीमुळे आवडतं नाही. अशा मुलांना एखाद्या वेगळ्या माध्यामातून दूध देण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. अलिकडे पुडिंगचं फॅड पाहायला मिळतंय. खरं तर पुडिंग म्हणजेच भारतात वर्षानुवर्ष केल्या जाणाऱ्या एकाप्रकारच्या पिठी आहेत. 

यासाठी तुम्ही खास करून वेगवेगळ्या धान्यांच्या किंवा धान्यांच्या पिठाच्या  दूधासोबत पीठी तयार करून ते मुलांना दिल्यास मुलं नक्कीच ते आवडीने खातील. यामुळे दुधासोबतच धान्यांमधील प्रथिनं आणि खनिजं त्यांना मिळतील. 

हे देखिल वाचा-

tasty milk recipe for kids
World Milk Day : दूधात विषारी यूरिया तर मिसळलेला नाही? लगेच 30 सेकंदात घरी असं चेक करा

नाचणी सत्व किंवा रवा, लापशी यांची खीर तुम्ही मुलांना देऊ शकता. तसचं तांदळाच्या पिठाची आणि ज्वारीच्या पिठाची ड्रायफूट टाकून केलेली पिठी मुलांना आवडू शकते. 

दूध सर्व्ह करण्याच्या ट्रीक- मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सतत आकर्षित करत असता. यासाठीच मुलांना दूध किंवा वर सांगितल्या प्रमाणे दूधाचे इतर पदार्थ देत असताना ते आकर्षिक ग्लासात किंवा वाटीत द्या.

स्मूदी किंवा मिल्कशेकसाठी खास वेगळे ग्लास आणि किंवा एखाद्या सुंदर बाऊलमध्ये तुम्ही खीर किंवा पिठी त्यांच्या आवडीचे ड्राय फ्रूट्स टाकून तुम्ही त्यांच्या पुढ्यात ठेवलीत तर ते आनंदाने या पदार्थांची मजा लुटतील. शिवाय विविध पदार्थ खाण्याची त्यांची आवड वाढेल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.