एकटेपणाबाबतची असुरक्षितता

सहा वर्षांची शुभा दोन तीन सेशन्सनंतर माझ्याशी छान बोलायला लागली होती. अतिशय गोड आणि लाघवी अशी ही मुलगी होती; पण खूप सेन्सिटिव्ह होती.
childrens Insecurity
childrens Insecuritysakal
Updated on

सहा वर्षांची शुभा दोन तीन सेशन्सनंतर माझ्याशी छान बोलायला लागली होती. अतिशय गोड आणि लाघवी अशी ही मुलगी होती; पण खूप सेन्सिटिव्ह होती. जवळजवळ दोन महिने झाले, ती शाळेत जायला टाळाटाळ करायची. सुरवातीला आईनं गोडीगुलाबीनं समजावलं, मग जबरदस्ती झाली; पण शाळेची वेळ झाली, की रडारड करायची.

शाळेत नेऊन बसवलं, तरी तिचं लक्ष नसायचं. इतर मुलांमध्ये मिसळायची नाही. एकटी एकटी राहायची. काहीही कारणं काढून घरी जायचं निमित्त शोधायची. बाहेर कुठे खेळत असली, तरी समोर आई किंवा बाबा दिसत असले पाहिजेत, असा तिचा हट्ट असायचा. नेहमीच्या नातेवाईकांकडे गेलं, तरी आई किंवा बाबांना सोडायची नाही.

मग एकटीनं तिथं मुक्कामाला राहणं दूरची गोष्ट. लहानपणी तिला एकटीला प्ले ग्रुपमध्ये सोडून, किंवा इतर मुलांमध्ये खेळायला सोडून, आई जवळच भाजी आणायला गेली, तरी आई पुन्हा समोर दिसेपर्यंत रडत राहायची. अगदी आकाश पाताळ एक करायची.

लहान मुलं मोठी होत असताना वेगवेगळ्या भावना अनुभवत असतात. साधारणपणे या भावना समान असतात, फक्त त्यांच्या तीव्रतेमध्ये मुलाप्रमाणे फरक असतो. जेव्हा मुलांचा (तान्ह्या बाळांचा) विकास होत असतो, तेव्हा सर्वप्रथम त्यांना आई, बाबा किंवा आसपासच्या काळजी घेणाऱ्या व्यक्ती; तसंच घरातलं वातावरण यांची सवय होत जाते.

जेव्हा आई किंवा काळजी घेणारी व्यक्ती आसपास दिसत नाही, तेव्हा ती बावचळतात; तसंच त्यांना असुरक्षित वाटू लागतं व ती रडू लागतात; तसंच अनोळखी, किंवा गर्दीच्या ठिकाणी आसपास ओळखीची व्यक्ती नसेल, तरीही मुलांना असुरक्षित वाटू शकतं. ही गोष्ट अगदी नॉर्मल आहे. किंबहुना तो develomental stage मधला भाग आहे.

परिस्थितीशी जुळवून घेणं शिकण्याच्या प्रक्रियेचाच तो भाग असतो. मात्र, थोडं मोठं झाल्यावर, किंवा शाळेत, नर्सरीत किंवा प्रायमरी स्कूलमधे जायच्या वयात सुद्धा प्रचंड आकांडतांडव, रडणं वगैरे गोष्टी सुरूच असतील तर ती सेपरेशन anxiety disorder असू शकते.

सेपरेशन Anxiety Disorder ची मुलांमधे सर्वसाधारण पुढील लक्षणं दिसतात

  • पालक तात्पुरते दूर झाले, तरी अतिशय अस्वस्थता निर्माण होणं, रडून गोंधळ घालणं.

  • वेडीवाकडी स्वप्नं पडणं, विशेषत: आई बाबा आपल्याला एकटं टाकून सोडून गेले आहेत अशी स्वप्न पडणं.

  • पालक सोडून जातील या भीतीनं शाळेत जाणं टाळणं.

  • आई किंवा बाबा सोडून काही काळासाठी सुद्धा एकटं झोपायला तयार नसणं.

  • सारखं आजारी पडणं.

  • आई-वडील सोडून जातील अशी सारखी भीती; तसंच आई-वडिलांना काही तरी होईल, त्यांना धोका आहे असं वाटत राहणं.

  • सारखं आई-बाबांना चिकटून राहणं

  • लहान सहान गोष्टींसाठी प्रचंड आकांडतांडव, हट्ट करणं.

थोड्या मोठया मुलांमध्येही पुढील लक्षणं दिसली तर दुर्लक्ष करू नये कारण ती separation anxiety शी संबंधित असू शकतात.

  • वयाला न शोभणारा हट्टीपणा.

  • शारीरिक त्रास होतोय उदा. पोट दुखतंय, डोकं दुखतंय अशा सारख्या तक्रारी आणि वैद्यकीय तपासणीमध्ये काहीच निष्पन्न न होणं.

  • समवयीन मुलामुलींपासून, मित्रमैत्रिणींपासून, नातेवाइकांपासून दूर राहणं

  • आठवडेच्या आठवडे शाळेत न जाणं.

  • कुठल्यातरी भीतीच्या किंवा दडपणाखाली राहणं.

  • घरापासून दूर राहण्याची अति भीती वाटणं.

  • याबाबतची कारणं आणि त्यासाठी करायच्या उपाययोजना यांच्याविषयी पुढील भागात जाणून घेऊ.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com