How to Control Cholestrol : धावत्या जगात अनेक आजार सहजपणे शरीरावर अधिराज्य गाजवता आहेत. त्यात तरुण असो वा वृध्द प्रत्येकालाच या आजारांचा त्रास होतो. कॉलेस्ट्रॉल अशाच आजारांपैकी एक आहे.
कॉलेस्ट्रॉल वाढण्यामागचं मुख्य कारण माहिती आहे का?
ते आहे आपण खात असलेलं अन्न. आपल्या शरीराला थोड्याच प्रमाणात कॉलेस्ट्रॉलची गरज असते, पण बाहेरच्या खाण्यामुळे कधी कधी ते वाढून जातं. शरीरात जास्त कॉलेस्ट्रॉल असेल तर त्याचे शरीराला खूप घातक परिणाम होतात.
पण कॉलेस्ट्रॉल म्हणजे नक्की काय?
कॉलेस्ट्रॉल हा शरीराला आवश्यक असलेला पिवळ्या रंगाचा स्निग्ध पदार्थ आहे, जो आपल्या शरीरातील यकृतामध्ये तयार होतो. पण त्यातही आपण 20 ते 30 टक्के तो आहारातून घेतो. हे शरीरातील रक्त प्रवाह आणि पेशींच्या निर्मितीच कारण आहे. निरोगी शरीरासाठी कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादेत असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा कॉलेस्ट्रॉलच प्रमाण वाढत तेव्हा त्याचा थर रक्तवाहिन्यांमध्ये गोठायला लागतो, ज्यामुळे रक्त प्रवाहावर परिणाम होतो आणि हार्ट अटॅक आणि हृदयाशी संबंधित इतर आजारांचा धोका वाढतो.
कोलेस्टेरॉल वाढण्याची कारण
अयोग्य आणि अवेळी आहार, अति प्रमाणात तळलेले पदार्थ, दुधाचे अति प्रमाणात सेवन, दुधावरची साय अति प्रमाणात खाण, बटर, चीझ, मैदा, साखर, केक, पेस्ट्री, बिस्कीट, आईस्क्रीम, मांसाहार, मासे, अंडी यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढते. दारू व धूम्रपान हे कॉलेस्ट्रॉल वाढण्याच महत्त्वाचं कारण आहे.
कॉलेस्ट्रॉलचे दोन प्रकार आहेत
1. एक कमी घनता लिपोप्रोटीन्स (LDL)
2. उच्च घनता लिपोप्रोटीन्स (HDL)
एलडीएलला बॅड कॉलेस्ट्रॉल असेही म्हणतात. त्याच प्रमाण जास्त झाल की शरीरात रोग निर्माण होऊ लागतात. दुसरीकडे, एचडीएलला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात, जे शरीरातून एलडीएल काढून टाकण्याचे काम करते.
म्हणजेच कॉलेस्ट्रॉल आपल्या शरीरासाठी चांगले आणि वाईट दोन्ही आहे. निरोगी शरीरासाठी आपण LDL चे प्रमाण कमी ठेवल पाहिजे आणि HDL चे प्रमाण वाढवल पाहिजे. अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये कॉलेस्ट्रॉल जास्त असते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी LDL कॉलेस्ट्रॉल असलेल्या पदार्थाचे सेवन कमी करा आणि HDL युक्त पदार्थाचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे.
कोणत्या पदार्थांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल असते
- मांस, लाल मांस या पदार्थांमध्ये भरपूर LDL म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉल असते, त्यांचे सेवन कमी करावे.
- जास्त तळलेल्या वस्तू किंवा डीप फ्राईड फास्ट फूडचे सेवन करू नये.
- बिस्किटे आणि पेस्ट्रीसारख्या पदार्थांमध्येही LDLचे प्रमाण जास्त असते.
- पिझ्झा, बर्गर यांसारख्या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जमा होते.
- तूप, मलईदार दूध आणि दही, खोबरेल तेल, लोणी यासारख्या गोष्टींमुळेही बॅड कोलेस्ट्रॉल वाढते.
कोणत्या पदार्थांमध्ये गुड कोलेस्ट्रॉल असते
फायबरचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ शरीरातील गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवते. HDL वाढल्यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी होऊन शरीर निरोगी राहत. म्हणूनच बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन केले पाहिजे. याशिवाय सफरचंद, द्राक्षे, ओट्स, बीन्स किंवा वालाच्या शेंगा, ऑलिव्ह ऑईल, स्ट्रॉबेरी, अक्रोड, बदाम, सोया फूड, पालेभाज्या, ग्रीन टी असे पदार्थ खावेत. यामुळे शरीरातील गुड कोलेस्ट्रॉलही वाढते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.