Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा पायांमध्ये होतात असे बदल; वेळीच ओळखा अन्यथा...

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरात नेमके कोणते बदल होतात हे जाणून घ्या.
Cholesterol Symptoms
Cholesterol SymptomsSakal
Updated on

आजकाल कोलेस्ट्रॉलची समस्या ही खूप गंभीर समस्या बनली आहे. महिला आणि पुरुष या दोघांमध्येही उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या वाढता आहे. बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ही समस्या उद्भवते.

खराब कोलेस्टेरॉलची समस्या चरबीयुक्त अन्नाचे सेवन आणि व्यायाम न केल्यामुळे होते. यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात देखील होतो. त्याची लक्षणे पायात दिसून येतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरात नेमके कोणते बदल होतात हे जाणून घेऊया.

हेही वाचा : कंपन्यांचे मुल्यांकन लक्षात घेऊन केलेली गुंतवणूक ठरेल फायदेशीर

उच्च कोलेस्टेरॉलमध्ये ही लक्षणे दिसतात :

पाय दुखणे :

कोलेस्टेरॉल वाढले की शरीराच्या प्रत्येक भागात फरक जाणवतो. हळूहळू पायाच्या नसा ब्लॉक होऊ लागतात. त्यामुळे पायात जडपणा येऊ लागतो आणि तळव्यांना जळजळ जाणवते. अशा परिस्थितीत तुम्हालाही पाय दुखण्याची समस्या असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

वारंवार गोळे येणे :

जेव्हा कोलेस्टेरॉल जास्त असते तेव्हा पायांमध्ये वारंवार गोळे येण्याची समस्या सुरू होते, तर जेव्हा तुम्ही व्यायाम करता किंवा चालता तेव्हा ही समस्या अधिक त्रासदायक बनते. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा ही समस्या आणखी वाढते. अशा स्थितीत पायात गोळे येण्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका.

Cholesterol Symptoms
सकाळी उठल्यावर मोबाईल वापरत असाल तर सावधान! होऊ शकतात गंभीर आजार

पाय थंड पडणे :

हिवाळ्यात पाय थंड राहतात पण जर तुमचे पाय नेहमी थंडीत थंड पडत असतील तर हे देखील उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे. ही लक्षणे उन्हाळ्यातही दिसून येतात. त्यामुळे तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुम्ही सावध रहा.

पायांच्या त्वचेच्या आणि नखांच्या रंगात बदल :

जर तुमच्या पायांच्या त्वचेचा किंवा पायाच्या नखांचा रंग बदलत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण आहे. असे घडल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

नोंद : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.