रितिका श्रोत्री
शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मी गेल्या दीड वर्षांपासून जिमला जात आहे. चित्रीकरण असो किंवा नसो, मात्र स्वतःच्या आरोग्यासाठी मी जिमला जातेच. सलग सहा महिने मी जिमला गेल्यामुळे, त्याची चांगले परिणाम मला दिसू लागले. त्यामुळे व्यायाम करण्याची मला आवड लागली. त्यातून आनंद आणि ऊर्जाही मिळू लागली. त्याचबरोबर शारीरिक ताकदही वाढली. काम करण्याची उमेद मोठ्या प्रमाणात येऊ लागली.