Health Care : आजकाल अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. मागील काही वर्षांपासून अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांची विक्री देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परंतु, या अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो, असे नुकत्याच एका संशोधनातून समोर आले आहे.
या अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमध्ये रेडी-टू-इट मांस, कुक्कुटपालन, सीफूडवर आधारित उत्पादने, साखरयुक्त पेये, दुग्धजन्य पदार्थ आणि काही नाश्त्याचे पदार्थ यांचा समावेश आहे. या संदर्भात अमेरिकेत ३० वर्षे संशोधन करण्यात आले, ज्याचा अहवाल बुधवारी बीएमजेमध्ये नुकताच प्रकाशित करण्यात आला.
या अहवालानुसार, संशोधकांनी असे नमूद केले की, सर्व प्रकारच्या अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांवर सार्वजनिकरित्या प्रतिबंध घातले जाऊ नये. परंतु, त्यांच्या संशोधनातील निष्कर्ष असे सांगतो की, दीर्घकालीन आरोग्यासाठी विशिष्ट प्रकारच्या अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचा वापर मर्यादित प्रमाणात व्हावा, याला त्यांचे समर्थन आहे.
या संशोधनातील एक मुख्य निष्कर्ष असा आहे की, अधिक प्रमाणात अल्ट्रा-प्रोसेस्ड केलेल्या अन्नाचा जास्त प्रमाणात वापर केल्याने अकाली मृत्यूचा धोका वाढू शकतो.
परंतु, हा परिणाम अल्ट्रा-प्रोसेस्ड केलेल्या पदार्थांच्या विशिष्ट उपसमूह आणि एकूण आहारानुसार मोठ्या प्रमाणात बदलू शकतो, आणि या संपूर्ण आहाराची गुणवत्ता दुय्यम आहे, असे विधान प्राध्यापक मिनयांग सॉंग (Mingyang Song) डिपार्टमेंट ऑफ इपिडर्मिलॉजी अॅन्ड न्यूट्रिशियन (Departments of Epidemiology and Nutrition) हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ, बोस्टन, यूएसए यांनी केले आहे.
महत्वाची बाब म्हणजे अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमध्ये पॅकेज केलेले भाजलेले पदार्थ, स्नॅक्स, फिजी ड्रिंक्स, साखरयुक्त तृणधान्ये आणि खाण्यास तयार असलेले रेडी-टू-इट खाद्यपदार्थ किंवा गरम उत्पादनांचा समावेश होतो. या खाद्यपदार्थांमध्ये अनेकदा रंग, इमल्सीफायर, फ्लेवर्स आणि इतर ॲडिटिव्ह्ज मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामध्ये, साखर, सॅच्युरेटेड फॅट्स आणि मीठ जास्त असते. मात्र, जीवनसत्वे आणि फायबर्स नसतात.
अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांचा संबंध हा लठ्ठपणा, हृदयरोग, मधुमेह आणि आतड्यांसंबंधित कर्करोगाशी जोडला जातो. परंतु, काही दीर्घकालीन संशोधनांमध्ये विशेषत: कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे संबंध तपासण्यात आले आहेत. यामध्ये अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थांमुळे या आजारांचा धोका वाढू शकतो, असे ही नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, हा एक निरीक्षणात्मक अभ्यास आहे. ज्यामधून ठळक कारणे आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडचे नेमके आरोग्यावर होणारे परिणाम याबद्दल कोणतेही ठोस निष्कर्ष काढले जाऊ शकत नाही, असे ही संशोधनकर्त्यांनी नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.