Morning Tips: सकाळी सकाळी धावपळीची वेळ असल्याने अनेकजण कामाच्या नादात स्वत:कडे दूर्लक्ष करतात. मात्र तुमचं आरोग्याकडे दूर्लक्ष करणं तुमच्यासाठीच घातक ठरू शकतं. धने हा मसाल्यातील एक घटक प्रत्येकाच्याच घरी उपलब्ध असेल. तुम्ही सकाळी सकाळी जर का धन्याचे हे काही उपाय केलेत तर आजार तुमच्या आजूबाजूलाही फिरकणार नाही.
स्टडीनुसार, धन्यांमध्ये बायोअॅक्टिव्ह फायटोकेमिकल्सयुक्त अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे तुमची चिंता, तणाव, मायग्रेन आणि कँसरसे बऱ्याच आजाराचे धोके कमी होतात. तसेच यात अँटिमायक्रोबियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणही असतात. चला तर धन्याच्या पाण्याचे सेवन तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरू शकते ते जाणून घेऊया.(Health)
१) अँटिऑक्सिडंटयुक्त असतात धने
धन्यांमधील अँटिऑक्सिडंट शरीरातील विषारी कणं बाहेर काढ्यास मदत करतात. तसेच अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांनी हृदयविकार, कँसर,गाठी, स्ट्रोक, श्वास घेण्यास त्रास, विक इम्युनिटी, पार्किसंसचा धोका कमी होतो.
२) स्ट्रेस कमी करण्यासही गुणकारी
आफ्रिकेतील स्टडी जर्नलनुसार धन्यांचा वापर ईरानमध्ये प्राचीन औषधाच्या रूपात आजही वापरला जातो. धन्यांचा अर्क दुखणं कमी करण्यास मदत करतो. तसेच माशपेशींमधील दुखण्यासाठीही फायदेकारी आहे.
आजारांवर मात करण्यासही फायदेशीर
डायबिटीज, ब्लडप्रेशर आणि कोलेस्ट्रॉल हे सगळे आजार आपल्या वाईट लाइफस्टाइलमुळे जास्त प्रमाणात उद्भवतात. मात्र धन्याच्या औषधी गुणधर्मामुळे तसेच यातील विटॅमिन ए, सी आणि अनेक पोषक तत्वांमुळे आजारांचा धोका टळतो.
धने शरीर थंड ठेवते
धने शरीरातील तापमान नियंत्रणात ठेवत शरीराला थंड ठेवण्यास मदत करते.
धन्याचा असा वापर करा
धन्याच पाणी बनवण्यासाठी दोन कप साधं पाणी घ्या आणि त्यात एक चमचा धने टाकत त्याला उकळवा. हे पाणी अर्धे होतपर्यंत त्याला उकळवा. अर्धे पाणी नंतर गाळणीने गाळत एका कपात काढा. याचे तुमच्या शरीराला जास्तीत जास्त फायदे असल्याचे दिसेल. रोज हे पाणी तुम्ही उपाश्यापोटी पिल्यास तुम्हाला कुठल्याही आजारांची लागण होणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.