JN.1 Covid : हिवाळा सुरू झाल्यावर का वाढतोय कोरोनाचा संसर्ग?

हिवाळा सुरू झाल्यावर कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट झपाट्याने वाढू लागला आहे.
JN.1 Covid
JN.1 Covid esakal
Updated on

JN.1 Covid : सध्या देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. देशातील एकूण ११ राज्यांमध्ये JN.1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. हिवाळा सुरू झाल्यावर कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट झपाट्याने वाढू लागला आहे. त्यामुळे, जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतासोबत इतर अनेक देशांमध्ये या नव्या व्हेरिएंटचे रूग्ण वाढत आहेत.

आतापर्यंत देशातील ११ राज्यांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला असून आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट झाली आहे. मूळात हिवाळा सुरू झाल्यावर कोरोनाचा संसर्ग का वाढला आहे? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यामागची कारणे काय आहेत? ते जाणून घेऊयात.

JN.1 Covid
भारतात आढळलेला कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 नेमकं काय आहे? जाणून घ्या लक्षणे

हिवाळ्यात का वाढतो कोरोना?

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची प्रकरणे पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. अशा परिस्थितीमध्ये हिवाळ्यात कोवीड-१९ चे नवे व्हेरिएंट्स का आढळतात ? असा प्रश्न उपस्थित होणे स्वभाविक आहे. कारण, हिवाळ्यातच या कोरोनाचे नवे प्रकार आढळतात आणि याचा संसर्ग देखील हिवाळ्यात वाढताना दिसून येतो.

या संदर्भात वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की, हिवाळ्यात श्वसनाचे संक्रमण वाढते. या सिझनमध्ये इनफ्लूएंझा अधिक प्रमाणात वाढते. त्यामुळे, फ्लूची लागण झाली की, सर्दी, खोकला आणि तापाचा त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये उपचारांसाठी रूग्ण रूग्णालयात जातात मग त्यांची कोवीड चाचणी केली जाते आणि मग कोवीडची प्रकरणे समोर येतात. या कारणांमुळे हिवाळ्यात कोवीडची रूग्णसंख्या देखील वाढते.

या फ्लूचा सर्वाधिक संसर्ग हा लहान मुलांना आणि वयोवृद्ध व्यक्तींना लगेच होतो. कारण, लहान मुलांची आणि वयोवृद्ध व्यक्तींची रोगप्रतिकारकशक्ती ही कमी असते.

हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते

हिवाळ्यामध्ये अनेक प्रकारच्या संसर्गांना लोक बळी पडतात. त्यामुळे, लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यामुळे, संसर्ग होणे हे सामान्य झाले आहे. या दिवसांमध्ये लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासोबत इतर वयोगटातील व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते. त्यामुळे, आपण सर्वजण संसर्गाला लगेच बळी पडतो आणि कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होते.

JN.1 Covid
JN.1 Covid : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट विरोधात बूस्टर डोस घ्यायची आवश्यकता आहे की नाही? काय म्हणतात तज्ज्ञ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.