Corona Virus Safety : कोरोना पुन्हा वाढत आहे! हे 5 गॅजेट्स घरात ठेवा, काम होईल सोपे

कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणे सतत वाढत आहेत
Corona Virus
Corona Virusesakal
Updated on

Corona Virus Safety : कोरोना व्हायरसची नवीन प्रकरणे सतत वाढत आहेत. बाजारात अशी अनेक गॅजेट्स आहेत जी महामारी टाळण्यास मदत करतात. तुम्हालाही तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सुरक्षितता हवी असेल, तर हे ५ गॅजेट्स तुमच्या घरी नक्कीच ठेवा.

Corona Virus
OpenAI : चॅट जीपीटीचं पुढचं व्हर्जन आणणार का?

Pulse Oximeter: कोविडमुळे रुग्णाची नाडी आणि ऑक्सिजन पातळी बदलते. ऑक्सिजनची पातळी खूप कमी असणे धोकादायक ठरू शकते. पल्स ऑक्सिमीटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे जे ऑक्सिजन लेव्हल आणि प्लस चेक करते. जर आपल्याला वैद्यकीय मदतीची आवश्यकता असेल तर पल्स ऑक्सिमीटरमुळे आपल्याला ते समजू शकतं.

Corona Virus
OpenAI Bug Bounty Program : शोधा ChatGPT मधील चुका आणि मिळवा 16 लाखांपर्यंतचं बक्षीस

Infrared Thermometer: ताप हे कोविड संसर्गाचे एक सामान्य लक्षण आहे. इन्फ्रारेड थर्मामीटर शरीराचे तापमान मोजण्यास मदत करते. विशेष म्हणजे शरीराचे तापमान तपासण्यासाठी कुणाला हात लावण्याची गरज नाही. हे उपकरण सामाजिक अंतराची विशेष काळजी घेते.

Corona Virus
Bike Tips For Summer : बाईक रायडिंग करताना अशी घ्या काळजी

Digital Blood Pressure Monitor: डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर हे एक उत्तम उपकरण आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य असेल ज्याला रक्तदाबाची समस्या असेल तर त्याचा फायदा घेतला जाऊ शकतो. कोविडच्या बाबतीत रक्तदाब तपासण्यासाठी याचा वापर करावा.

Corona Virus
Tech Tips : चुकीच्या UPI आयडीवर पेमेंट केले? पैसे परत मिळण्यासाठी हे काम लगेच करा

Steamer and Nebulizer Machine: स्टीमर आणि नेब्युलायझर मशीन सर्दी आणि फ्लूच्या बाबतीत खूप मदत करते. याचा वापर केल्याने छातीला खूप आराम मिळतो. जर कोणाला दमा किंवा फुफ्फुसाचा त्रास असेल तर हे उपकरण खूप उपयोगी पडेल. याचा वापर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीही होऊ शकतो.

Corona Virus
Men's Health : वयाची 30 वर्षे उलटताच पुरुषांनी डाएटमधे घ्या हे पदार्थ, आयुष्यभर आजारमुक्त राहाल

UV-C Sanitizer or Lamp: कोरोना टाळण्यासाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच दैनंदिन गोष्टी स्वच्छ आणि संसर्गमुक्त ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. फोन किंवा किल्ली सारख्या गोष्टी जंतूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी UV-C सॅनिटायझर किंवा दिवा वापरला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.