Corona New XEC Variant: जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. आता कोरोनाचा आणखी एक नवा प्रकार 'XEC' युरोपमध्ये झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा हा प्रकार पहिल्यादा जून 2024 मध्ये जर्मनीमध्ये आढळला होता आणि आतापर्यंत 13 हून अधिक देशांमध्ये पोहोचला आहे.
कोरोनाचा नवा प्रकार ओमिकॉन KS.1.1 आणि KP.3.3 या दोन उप-प्रकारांचे संयोजन असल्याचे म्हटले आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार किती धोकादायक असू शकतो आणि कोणती काळजी घ्यावी जाणून घेऊया.
कोरोनाचा हा नवा प्रकार (XEC) ओमिक्रॉन प्रकारातील KS.1.1 आणि KP.3.3 या दोन उप-प्रकारांचे संयोजन असल्याचे म्हटले जात आहे. दोन्ही उप-रूपे आधीच जगासाठी चिंतेचे कारण बनले आहेत, परंतु दोघांच्या संयोजनामुळे नवीन प्रकाराचा जन्म होऊ शकतो जो अधिक संसर्गजन्य आणि धोकादायक असू शकतो.
कोरोनाचा नवा प्रकार (XEC) किती धोकादायक आहे याबाबत शास्त्रज्ञांनी स्पष्टपणे सांगितलेले नाही. पण संसर्गजन्य असल्याने काळजी घेण्यास सांगितले आहे. कारण या विषाणूचा झापाट्याने प्रसार होऊ शकतो.
ताप येणे
घसा खवखवणे
खोकला
वास न लागणे
भूक न लागणे
अंगदुखी
कोरोनाच्या नव्या (XEC) प्रकाराबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लोकांनी लसीकरण करावे. हा विषाणूपासून बचाव करण्यासाठी एकमेक मार्ग आहे. तसेच सुरक्षित अंतर ठेवावे, सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरावे, स्वच्छतेची काळजी घ्यावी यासारख्या गोष्टींचे पालन करावे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.