Health Tips: कफ झालाय? 'या' उपायांनी मिळेल आराम

कफ दूर करण्यासाठी डॉक्टरांकडे अनेक औषधे उपलब्ध आहेत, परंतु यासाठी आम्ही काही घरगुती उपाय सांगत आहोत.
Health Tips
Health Tipsesakal
Updated on

ऋतू बदल झाला की, घराघरात सर्दी, फ्लू आणि घसा खवखवणे यासारख्या आजार वाढतात. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे असे घडते. जेव्हा कोणी अशा आजारांनी ग्रस्त असतो तेव्हा शरीरात कफाचे प्रमाण वाढते. साहजिकच, नाक, छाती आणि घशात जमा झालेला कफ लवकर बरा होऊ देत नाही. घशाच्या कोरडेपणापासून संरक्षण करण्यासाठी शरीराला थोड्या प्रमाणात कफाची आवश्यकता असते, परंतु ते जास्त प्रमाणात तयार झाल्यास अस्वस्थता येते आणि सामान्य सर्दी किंवा फ्लू सारखे संक्रमण होऊ शकते. कफ दूर करण्यासाठी डॉक्टरांकडे अनेक औषधे उपलब्ध आहेत, परंतु काही घरगुती उपायांनी कफ काढून टाकून तुम्ही सर्दी, फ्लू आणि घसा खवखवणे यासारख्या आजारांपासून स्वतःचे संरक्षण करू शकता

Health Tips
Health News: डेंग्यू पेशंटच्या डाएटमध्ये 'या' गोष्टींचा करा समावेश, होईल फास्ट रिकव्हरी

मेथीचे दाणे

मेथीच्या दाण्यांमध्ये संयुगे असतात जे ताप आणि कफ कमी करण्यास मदत करतात. मेथीचे पाणी प्यायल्याने कफ कमी होतो आणि कफ बाहेर पडण्यास मदत होते. तुम्हाला फक्त एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत आणि ५०० ​​मिली पाण्यात उकळायचे आहेत. अर्धा कप हे पाणी उकळून नियमित प्यायल्याने कफात आराम मिळतो.

Health Tips
Health Tips: झोप पूर्ण होऊन पण येतो आळस? हे उपाय करा

तुळशीचा चहा

कफ कमी करण्यासाठी तुळशीची पाने गुणकारी ठरू शकतात. तुम्ही ताजी तुळशीची पाने किंवा वाळलेली पाने घेऊ शकता. जर तुम्ही तुळशीची ताजी पाने वापरत असाल तर १० ग्रॅम पाने घ्या. वाळलेल्या तुळशीच्या पानांचा एक चमचा पुरेसा असू शकतो. एक किंवा दोन वेलचीच्या कळ्या पाण्यात उकळा. हे पाणी गोड करण्यासाठी त्यात थोडे मध घालून तुळशीच्या पानांचा चहा बनवा. हा तुळशीचा चहा खोकला आणि फुफ्फुसाच्या इतर समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

Health Tips
Ganeshotsav 2022: बाप्पाच्या दर्शनासाठी जाताना मोदक, पेढ्यांशिवाय ५ हेल्दी पर्याय

द्राक्षे

कफ संबंधित समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपण लाल किंवा हिरव्या द्राक्षांचे सेवन केले पाहिजे. त्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे तुमच्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी उत्तम असू शकते.

Health Tips
Health Tips: पाठदुखीने हैराण आहात? ट्राय करा ३ सोपे उपाय

बडीशेप

एक चमचा बडीशेप पाण्यात उकळून अर्धी वाटी करा. या पाण्याचे सेवन केल्याने घसादुखी आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.