कोवॅक्सिन 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी उच्च रोगप्रतिकारक - Lancet

लॅन्सेट या विज्ञानविषय नियतकालिकेत प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे.
COVAXIN
COVAXINCOVAXIN
Updated on

नवी दिल्ली : भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोना प्रतिबंधक लस ही २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी उच्च रोगप्रतिकारक असल्याचा दावा लॅन्सेट या विज्ञानविषय नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. तसेच भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडच्यावतीनंही (BBIL) शुक्रवारी याची घोषणा करण्यात आली. (Covaxin vaccine safe highly immunogenic in children aged 2 to 18 Lancet study)

COVAXIN
मुंबई : हिंदमाता, मिलन सब वे यंदा तुंबणार नाहीत - आदित्य ठाकरे

यासंदर्भात लॉन्सेटमध्ये १६ जून रोजी एक अभ्यास प्रकाशित करण्यात आला. यामध्ये म्हटलं की, भारत बायोटेकने 2 ते 18 वयोगटातील निरोगी मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये कोवॅक्सिनची सुरक्षितता, प्रतिक्रिया आणि रोगप्रतिकारक शक्तीचं मूल्यांकन करण्यासाठी फेज II/III, ओपन-लेबल आणि मल्टीसेंटर अभ्यास केला होता. दरम्यान, जून 2021 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत लहान मुलांमध्ये झालेल्या क्लिनिकल चाचणीमध्ये सुरक्षितता, कमी प्रतिक्रियाकारकता आणि चांगली रोगप्रतिकारकता दिसून आली.

COVAXIN
अग्निपथ योजनेचा पहिला बळी? सैन्यभरतीची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

दरम्यान, हा डेटा ऑक्टोबर २०२१ मध्ये सेन्ट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कन्ट्रोल ऑर्गनायझेशनकडे (CDSCO) सोपवण्यात आला. त्यानंतर ६ ते १८ वयोगटातील मुलांसाठी आपत्कालिन वापरासाठी या लसीला परवानगी मिळाली. याबाबत भारत बायोटेकचे चेअरमन आणि एमडी डॉ. कृष्णा इल्ला म्हणाले, लहान मुलांना लसीपासून सुरक्षा मिळणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. पण आम्हाला आनंद होतोय की आमच्या कोव्हॅक्सिन या लसीनं मुलांची सुरक्षा आणि रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचं सिद्ध केलं आहे.

COVAXIN
एलाॅन मस्क यांच्याविरोधात २० हजार अब्ज रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा

अभ्यासात कोणतीही गंभीर प्रतिकूल घटना नोंदवली गेलेली नाही. एकूण 374 प्रतिकूल घटनांची नोंद यामध्ये करण्यात आली आणि त्यापैकी बहुतांश घटना सौम्य स्वरूपाच्या होत्या आणि एका दिवसात त्याचं निराकरणही झालं. कोवॅक्सिन ही द्रव स्वरुपातील लस आहे. जी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात साठवली जाते. या लशीचं शेल्फ लाइफ 12 महिने असते, अशी माहितीही डॉ. कृष्णा यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.