Covid रूग्णांमधे स्ट्रोक अन् हार्ट अटॅकचा धोका जास्त? वाचा काय सांगतात तज्ज्ञ

कोविडमुळे स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो का ते आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया
Covid Side Effects
Covid Side Effectsesakal
Updated on

Covid Side Effects : कोविडने मागल्या दोन-तीन वर्षापासून जगभरात धुमाकूळ घातलाय. जनतेची भिती कमी होत नाही ते लगेच नव्या व्हॅरिएंटबाबत माहिती पुढे येते अन् जगभरातील लोकांवर पुन्हा कोरोनाचे सावट असल्याचे कळते. कोविडमुळे स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो का ते आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

कोविडदरम्यान लोकांमधे स्ट्रेस लेव्हल फार वाढल्याचे दिसून येते. अशात हार्ट अटॅक स्ट्रोकचे प्रमाण वाढू शकते. तसे तर कोविड रूग्णांमधे याचा धोका फार कमी प्रमाणात दिसून आला असला तरी तज्ज्ञांचं नेमकं काय मत आहे ते जाणून घेऊया.

स्ट्रोकचा धोका कोणाला?

जे कोविड रूग्ण वृद्ध आहेत किंवा ज्यांना मधुमेह, हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग यांच्यासारख्या समस्या आहेत किंवा ज्यांना वडिलोपार्जित एखादा रोग आहे अशा रूग्णांमधे कोविडदरम्यान स्ट्रोकचा धोका वाढतो.

कोविड रूग्णांमधे स्ट्रोकची लक्षणे कोणती?

स्ट्रोक हा फार भयंकर त्रास आहे. या रूग्णांना मेंदूवरील ताण, अंगात अचानक करंट संचारणे, मूड स्विंग होणे, छातीत दुखणे, बधिरपणा किंवा चेहऱ्यावर अशक्तपणा दिसणे, किंवा बोलताना त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे दिसतात लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Covid Side Effects
Corona Update : कोरोनाचे संकट उभे, लस मात्र गायब

पोस्ट कोविडमधे अशी घ्या सेल्फ केअर

अशा व्यक्तिंनी कायम स्वत;ची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला हलकी लक्षणे जरी दिसली तरी लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणे उत्तम. तुम्ही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. स्ट्रोकचा धोका असणाऱ्या रूग्णांना कायम इमर्जंसी नंबर सोबत ठेवण्याचा सल्लाही दिला जातो. (Health)

Covid Side Effects
Covid : कोरोनामुळे गर्भावस्थेतील दोन बालकांच्या मेंदूला इजा; अभ्यासातून स्पष्ट

कोविडपासून सावध राहा

कोविडचा तुमच्या शरीरावर तुमच्या प्रतिकारशक्तीनुसार परिणाम होऊ शकतो .तेव्हा तुम्ही प्रत्येकवेळी सावधगिरी बाळगणे फार गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी जाताना सुरक्षेसाठी मास्क आवर्जून लावणे कधीही उत्तम ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.