कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन २७५ रुपयांना मिळणार? DCGI कडून मान्यतेची प्रतीक्षा

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन २७५ रुपयांना मिळणार? DCGI कडून मान्यतेची प्रतीक्षा
Updated on

कोरोना व्हायरस प्रतिबंधक लस परवडण्याजोग्या दरात उपलब्ध करण्याच्या प्रयत्नामध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणार्‍या कोव्हिशिल्ड,( Covishield )आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) दोन लसींची किंमत 275 रुपये प्रति डोस आणि 150 रुपयांच्या अतिरिक्त सेवा शुल्कासह मर्यादित केली जाण्याची शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि भारत बायोटेकने लस खुल्या बाजारात आणण्यासाठी सरकारकडे परवानगी मागितली आहे.

दोन लसींना भारतात आपत्कालीन वापरासाठी अधिकृत (EUA) मंजूर करण्यात आली आहे, त्यांना लवकरच ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून खुल्या बाजारात आणण्यासाठी मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे, अधिकृत सरकारी सूत्रांनी सांगितले, वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले.

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन २७५ रुपयांना मिळणार? DCGI कडून मान्यतेची प्रतीक्षा
तुमचा जोडीदाराचा डॉमेनिटिंग स्वभाव कसा ओळखाल? जाणून घ्या

सध्या, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीसाठी खाजगी रुग्णालयांसाठी प्रति डोस 1,200 रुपये शुल्क आकारले जात आहे, तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या कोविशील्डची किंमत खाजगी सुविधांमध्ये रु. 780 शुल्क आकारले जात आहे. या किंमतींमध्ये 150 रुपये सेवा शुल्क समाविष्ट आहे.

नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA)ला परवडण्यायोग्य दरामध्ये लसींना उपलब्ध करुन देण्यासाठी किंमतीवर मर्यादा आणण्याच्या दिशेने काम सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

''NPPAला लसींच्या किंमती मर्यादित करण्याच्या दिशेने काम करण्यास सांगितले आहे. किंमत 150 रुपयांच्याच्या अतिरिक्त सेवा शुल्कासह प्रति डोस 275 रुपये मर्यादित केली जाण्याची शक्यता आहे," एका सूत्राने पीटीआयला सांगितले.

केंद्रीय औषध मानक नियंत्रण (Central Drugs Standard Control Organisation)संस्थेच्या COVID-19 वरील विषय तज्ञ समितीने 19 जानेवारी रोजी प्रौढ लोकसंख्येमध्ये विशिष्ट अटींच्या अधीन राहून वापरण्यासाठी COVID-19 प्रतिबंधकत लसी Covishield आणि Covaxin ला खुल्या बाजार मान्यता देण्याची शिफारस केली.

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन २७५ रुपयांना मिळणार? DCGI कडून मान्यतेची प्रतीक्षा
भारताचं राष्ट्रगीत टांझानियाच्या भावंडांनी गायलं; Video Viral

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक (सरकारी आणि नियामक व्यवहार) प्रकाश कुमार सिंग यांनी 25 ऑक्टोबर रोजी DCGI कडे कोविशिल्ड लसीसाठी नियमित बाजार मंजुरीसाठी अर्ज सादर केला होता.

अलीकडेच, भारत बायोटेकचे पूर्णवेळ संचालक व्ही कृष्ण मोहन यांनी देखील कोवॅक्सिनसाठी नियमित बाजार अधिकृतता मिळविण्यासाठी प्री-क्लिनिकल आणि क्लिनिकल डेटासह रसायनशास्त्र, उत्पादन आणि नियंत्रणे यावरील संपूर्ण माहिती सादर केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.