Oral Care Resloutions: नवीन वर्षात दातांचे आरोग्य जपण्यासाठी फॉलो करा ‘हे’ मजेशीर संकल्प

सर्वांगीण विकासासाठी दातांचे आरोग्य जपणे हे फार महत्वाचे आहे. या नव्या वर्षात तुम्ही दातांचे आरोग्य जपण्यासाठी काही मजेशीर संकल्प नक्कीच करू शकता.
Oral Care Resloutions
Oral Care Resloutionsesakal
Updated on

Oral Care Resloutions : नवीन वर्षाला नुकतीच सुरूवात झाली आहे. या नव्या वर्षात अनेक जणांनी विविध प्रकारचे संकल्प केले असतील, कुणी चांगल्या सवयींसाठी, कुणी फिटनेससाठी केले असतील. खास करून शारिरीक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी अनेक संकल्प आणि प्रयत्न केले जातात. मात्र, या सगळ्यात दातांच्या आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही.

सर्वांगीण विकासासाठी दातांचे आरोग्य जपणे हे फार महत्वाचे आहे. या नव्या वर्षात तुम्ही दातांचे आरोग्य जपण्यासाठी काही मजेशीर संकल्प नक्कीच करू शकता. कोणते आहेत ते संकल्प? चला तर मग जाणून घेऊयात.

Oral Care Resloutions
Dental Health : चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये दंत आरोग्याची महत्वाची भूमिका

ब्रशिंग प्लेलिस्ट

तुमचे दात घासण्यासाठी तुमच्या आवडत्या गाण्यांची एक विशेष प्लेलिस्ट तयार करा. या गाण्यांमुळे, तुमची दात घासण्याची दिनचर्या उत्साही बनण्यास मदत होईल. तुम्ही यामध्ये तुमच्या आवडत्या, शांत गाण्यांची ही निवड करू शकता.

आर्टिस्टिक फ्लोसिंग

दातांची स्वच्छता करण्यासाठी फ्लोसिंग अतिशय महत्वाचे आहे. तुम्ही हे फ्लोसिंगचे टेक्निक कलात्मक (अर्टिस्टिक) पद्धतीने वापरू शकता. या फ्लोसिंगमुळे तुमच्या दातांची चांगल्या प्रकारे स्वच्छता होते.

डाय डेंटल डेकॉर

तुम्ही रोज बाथरूममध्ये दात घासता. मात्र, दातांच्या आरोग्यासाठी तुम्ही तुमचे बाथरूम देखील छान प्रकारे सजवू शकता. यासाठी तुम्ही टूथ-थीम डेकोरेशनचे साहित्य खरेदी करू शकता आणि या साहित्याच्या मदतीने तुमचे बाथरूम छान प्रकारे सजवू शकता. तुम्ही कलरफूल डेंटल थीमवॉल आर्टचा ही या कामी वापर करू शकता. यामुळे, तुम्हाला दातांची स्वच्छता करण्यासाठी प्रेरणा मिळेल.

ब्रशिंग चॅलेंजेस

तुमच्या ब्रशिंग गेमला अपडेट करण्यासाठी तुम्ही स्वत: ला दात घासण्याचे अनोखे चॅलेंज देऊ शकता. यासाठी तुम्ही काही मजेशीर गेम्स खेळू शकता. जसे की, एका पायावर उभे राहून दात घासणे किंवा ज्या हाताने तुम्ही जास्त काम करत नाही किंवा दात घासत नाही, त्या हाताने दात घासणे अशा मजेशीर गोष्टी करून तुम्ही स्वत:ला चॅलेंज देऊ शकता.

सेलिब्रिटी स्माईल मेकओव्हर

तुम्हाला आवडणारे सेलिब्रिटी किंवा ज्यांची स्माईल तुम्हाला प्रचंड आवडते, अशा सेलिब्रिटींचे स्माईल करतानाचे फोटो तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये किंवा रूममध्ये लावू शकता. यामुळे, तुम्हाला तुमच्या दातांचे आरोग्य जपण्यासाठी प्रेरणा मिळेल.

डेंटल सेल्फी डायरी

या नव्या वर्षात तुम्ही तुमची डेंटल सेल्फी डायरी तयार करू शकता. यासाठी तुम्ही दर महिन्याला तुमच्या सुंदर स्मितहास्याची सेल्फी काढा आणि हे फोटो सेव्ह करा. यामुळे, तुम्हाला तुमच्या दातांमध्ये आणि हिरड्यांमध्ये दिसणारे बदल दर महिन्याला ट्रॅक करता येतील आणि त्याप्रमाणे दातांची काळजी घेता येईल.

ओरल हेल्थ व्हिजन बोर्ड

दातांचे आरोग्य जपण्यासाठी तुम्ही दंतआरोग्याचे व्हिजन बोर्ड तयार करू शकता. त्यासाठी तुम्ही दातांच्या आरोग्यासंबंधीत असलेले कोट्स, गोल्स आणि काही फोटो गोळा करू शकता. या सगळ्या गोष्टींचा छान कोलाज करून तो तुमच्या लिविंग स्पेसमध्ये लावू शकता. यामुळे, त्या फोटोकडे पाहिल्यावर तुम्हाला दातांचे आरोग्य जपण्याची प्रेरणा मिळेल.

नियमितपणे दातांची तपासणी करणे

दातांच्या समस्या निर्माण होऊ नये, यासाठी तुम्ही वेळोवेळी दातांची काळजी घेणे महत्वाचे आहे. यासोबतच, दातांची नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे. दर सहा महिन्यांनी दंत तपासणी आणि दातांची स्वच्छता करण्यासाठी दंतचिकित्सकांची भेट घ्या. तुमच्या समस्यांबदद्ल त्यांच्याशी बोलून तुम्ही चर्चा करू शकता.

दातांच्या आरोग्याशी संबंधित असलेल्या या गोष्टी आणि संकल्प तुमही कसोशीने पाळले आणि त्यात सातत्य ठेवले तर तुमच्या दातांचे आरोग्य वर्षभर चांगले राहिल यात काही शंका नाही.

Oral Care Resloutions
Health Care : सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पतींचे करा सेवन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.