नुकताच काही दिवसापूर्वी भारतीय क्रिकेटर ऋषभ पंत याचा खूप मोठा अपघात झाला. त्याच्यावप सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता त्याची गुडघ्याची सर्जरी होणार आहे. ऋषभला बरं व्हायला वर्षही लागू शकतं मात्र लिगामेंट सर्जरीनंतर तो क्रिकेट खेळू शकणार आहे. आज आपण याच लिगामेंट सर्जरीविषयी जाणून घेणार आहोत. (cricketer Rishabh Pant accident what is Ligament Surgery health)
लिगामेंट म्हणजे काय?
लिगामेंट टिश्यूच्या स्ट्रॉन्ग बँड असतो. जो एका हाडाने दुसऱ्या हाडाला जुळलेला असतो. यामुळे हाडे चांगलं काम करतात मात्र छोट्याश्या अपघातानेही यावर गरजेपेक्षा जास्त प्रेशर आले तर दबाव वाढतो आणि हा बँड तुटतो त्यालाच लिगामेंट टियर म्हणतात.
लिगामेंटसंबंधीत जखम ही तीन स्तराची असते. होग्रेड 1 कमी लिगामेंट टियर, ग्रेड 2 मीडियम लिगामेंट टियर आणि ग्रेड 3 कंप्लीट लिगामेंट टियर म्हणजेच लिगामेंट पुर्णपणे निकामी झालंय.
लिगामेंट सर्जरी नेमकी काय?
लिगामेंट सर्जरी आर्थ्रोस्कोपिक टेक्नीकनी केली जाते. शरीराच्या कोणत्याही पार्टवरील हेल्दी स्किनला कापून त्याला गुडघ्याच्या ठिकाणी प्लांट केली जाते.
यासाठी सुरवातीला धातुची एक पातळ नळीचा रॉड आतमध्ये टाकला जातो. ज्यामध्ये लावलेल्या लेन्सच्या मदतीने डॉक्टर आतील गोष्टी स्पष्टपणे पाहू शकतात. आर्थोस्कोपद्वारे जर लिगामेंट तुटली त्याला रिपेयर केले जाते आणि रिकंस्ट्रक्शन केले जाते. आर्थोस्कोपिकद्वारे गुडघ्याची सर्जरी अधिक सोपी झाली आहे.
45 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या लोकांची ही सर्जरी सहज यशस्वी होते. या सर्जरीमुळे गुडघ्याची मूवमेंट आणि स्टॅबिलिटी सामान्य होण्यास मदत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.