तर काय?

मला दही फार आवडते. दही-साखर-पोळी, दही-भात, मीठ घालून दही माझ्या आहारात वरचेवर असते.
Curd Child
Curd Childsakal
Updated on

मला दही फार आवडते. दही-साखर-पोळी, दही-भात, मीठ घालून दही माझ्या आहारात वरचेवर असते. दही नियमित खाणे व रात्री खाणे चांगले नाही असे मध्यंतरी ऐकले. हे खरे आहे का?

- संजय माने, सोलापूर

उत्तर - आयुर्वेदात दह्यापेक्षा ताक जास्त आरोग्यादायी आहे असे सांगितलेले आहे. दही नियमित खाणे व रात्रीच्या वेळी खाणे वर्ज्य सांगितलेले आहे. रात्री पाचनाग्री मंद असल्यामुळे कदाचित दही, दूध वगैरे रात्री घेऊ नये असे सांगितलेले आहे. दही ताजे असावे. दह्याबद्दल संपूर्ण माहिती डॉ. मालविका तांबे यूट्यूब चॅनेलवर व्हिडिओमध्ये दिलेली आहे.

मला फॅमिली डॉक्टरमधील लेख फार आवडतात. त्यातील बऱ्याच माहितीचा उपयोग मी घरात करून घेतो. माझी नात दीड वर्षांची आहे. तिच्यावर आम्ही सगळे गर्भसंस्कार केलेले आहेत. तिचे सर्व माईल स्टोन्स व्यवस्थित आहेत तसेच जेवण, झोपसुद्धा व्यवस्थित आहे. फक्त बऱ्याचदा तिचे डोके गरम असते आणि खाताना तिला घाम जास्त येतो. हे नॉर्मल आहे का व नसल्यास यावर काय उपाय करता येईल ते सुचवावे.

- हिमानी बावडेकर, पुणे

उत्तर - जेवताना घाम येणे वा डोके गरम लागणे हे शरीरात असलेल्या अतिरिक्त उष्णतेचे लक्षण आहे. रोज रात्री झोपण्याआधी तिच्या डोक्याला ब्रह्मलीन तेल नक्की लावावे. तसेच जमत असल्यास संतुलन पादाभ्यंग किटच्या साहाय्याने पादाभ्यंग करण्याचाही फायदा होऊ शकेल. उष्णता सहन होण्याच्या दृष्टीने तिला रोज मनुकांचे पाणी द्यावे. ५-६ मनुका २-३ तास पाण्यात भिजवाव्या, नंतर हाताने कुस्करून पाणी गाळून तिला प्यायला द्यावे. तसेच तिला संतुलन प्रवाळपंचामृत गोळ्या, कूलसॅन सिरप देण्याचा फायदा दिसू शकेल. तिचे पोट रोज साफ होत आहे की नाही याकडेही लक्ष द्यावे. पचनाची तक्रार दिसत असल्यास संतुलन बाल हर्बल सिरप देण्याचा फायदा होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.