माझी मुलगी ८ महिन्यांची आहे. बाळंतपण झाल्यापासून माझी पाळी आलेली नाही पण अंगावरून पांढरे जात आहे. त्यामुळे मला खूप थकवा जाणवतो. गर्भारपणात डॉ. बालाजी तांबे यांचे गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून सर्व नियमांचे पालन केले होते. प्रसूतीनंतर मात्र कशासाठीही वेळ मिळालेला नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
- सुदीक्षा अगरवाल, अमरावती
उत्तर : बाळंतपणानंतर स्त्रीची व्यवस्थित काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी आयुर्वेदात सूतिका परिचर्येचे पालन करायला सांगितलेले आहे. यामध्ये संपूर्ण शरीराला अभ्यंग करणे तसेच धूप-शेक अत्यंत महत्त्वाचे असते. सकाळी स्नान झाल्यावर किंवा शक्य असेल त्यावेळी योनीभागी संतुलन शक्ती धुपासारख्या शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या धुपाची धुरी घ्यावी. संतुलन फेमिसॅन सिद्ध तेलासारख्या तेलाचा पिचू नियमितपणे वापरणे सुरू करावे.
शरीराची ताकद भरून येण्याच्या दृष्टीने डिंकाचे लाडू, संतुलन धात्री रसायन किंवा सॅन रोझसारखे रसायन घेणे उत्तम राहील. एकूणच स्त्री स्वास्थ्य उत्तम राहण्याच्या दृष्टीने व प्रजननसंस्थेची ताकद टिकून राहण्यासाठी आयुर्वेदात उत्तरबस्ती हा उपचार करून घेण्यास सुचवले आहे, ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करून घ्यावी. तसेच मदतीच्या दृष्टीने काही दिवस संतुलन प्रशांत चूर्ण, संतुलन पुनर्नवासव, संतुलन फेमिनाइन बॅलन्स आसव घेण्याचा फायदा होऊ शकेल. पांढरे पाणी जाण्याच्या त्रासाकडे दुर्लक्ष करू नये, लगेचच तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मी ३५ वर्षांचा आहे, मला गेली ३-४ वर्षे शौचाला साफ होत नाही. एवढ्या कमी वयात नियमित औषध घेण्याची माझी इच्छा नाही. रोज सकाळी एक लिटर गरम पाणी पिल्यावर शौचाला होते. कृपया यावर उपचार सुचवावा.....
- राकेश बराटे, ठाणे
उत्तर : सकाळी उठल्यावर आपसूक शौचाला जाण्याची भावना होणे हे आरोग्याचे लक्षण आहे. सकाळी गरम पाणी किंवा चहा प्यायल्यावर शौचाला जाण्याची भावना होणे यामुळे पोट पूर्णपणे साफ होईल असे नाही. याचे कारण शरीरात वातदोषाचे असंतुलन असणे किंवा आतड्यांत कोरडेपणा असणे हे असू शकेल. या दोन्हींसाठी रात्री झोपण्यापूर्वी लहान कपभर कोमट पाणी, दोन चमचे साजूक तूप व एक चिमूट सैंधव मीठ घालून घेणे नियमितपणे घ्यावे.
रात्री झोपण्यापूर्वी सॅनकूल चूर्णासारखे चूर्ण नियमित घ्यावे. पचन नीट होण्याच्या दृष्टीने जेवणांनंतर अन्नयोग गोळ्या व पित्ताच्या संतुलनासाठी संतुलन पित्तशांती गोळ्या घ्याव्या. आहार फार कोरडा नसावा. आहारात सूप, आमटी, ताक वगैरे द्रवपदार्थांचा समावेश नक्की असावा. रोज दुधामध्ये संतुलन शतानंत कल्प टाकून घेणे उत्तम राहील. पोटाला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे एखादे तेल नियमितपणे लावण्याचा फायदा होऊ शकेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.