डॉ. उमेश वैद्य, वरिष्ठ बालरोगतज्ञ, पुणे
सध्या डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाच्या वाढत्या केसेसचा विचार करता, ह्या बाबतीत एका पेक्षा अधिक आजार असलेले रूग्ण आणि लहान मुलांना असे आजार झाल्यास त्या केसेस सर्वाधिक आव्हानात्मक असतात. डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या डासांमुळे पसरणाऱ्या रोगांचे वेक्टर-बोर्न रोग म्हणून वर्गिकरण केले जाते.
डेंग्यू आणि मलेरियाच्या केसेस वाढत असल्यामुळे लहान मुलांना असे गंभीर आजार होऊ न देणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तेव्हा आपण याची लक्षणे, खबरदारी आणि उपचार तसेच काय करावे आणि काय करू नये हे समजून घेऊया.
जेव्हा डास चावतो आणि रक्त शोषून घेतो तेव्हा तो संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या रक्तातील रोग निर्माण करणारे विषाणू आणि पॅरासाईटस (परजीवी जंतू) त्यासोबत शोषून घेतो, ज्याची डासांमध्ये अनेक पटींनी वाढ होते आणि नंतर पुढच्या वेळी जेव्हा डास इतर व्यक्तींना चावतो तेव्हा त्याची इतरांना लागण होते.
या वेक्टर-बोर्न रोगाचा संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये सुरूवातीला सामान्य विषाणूजन्य ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि वारंवार उलट्या अशी लक्षणे दिसतात. परंतू, ही लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे निश्चित करण्याची गरज असते. चिकनगुनियाची सुरूवात तीव्र स्वरूपात सांधे आणि पाठ दुखण्याने होते.
त्याचपमाणे, डेंग्यूच्या लक्षणांमध्ये डोळ्यांजवळ आणि स्नायू तीव्र स्वरूपात दुखण्याचा समावेश असतो आणि सांध्याऐवजी अनेकदा तीव्र स्वरूपात हाडे दुखतात. मलेरियामध्ये त्या व्यक्तीला खूप थंडी वाजणे व त्यानंतर खूप ताप येतो. हा अॅनोफिलीस डासामुळे होतो आणि फक्त हाच डास मलेरिया पसरवतो.
त्याशिवाय मलेरियाच्या विरूद्ध, इतर दोन रोगांमध्ये चिकुनगुनिया आणि डेंग्यूमध्ये त्वचेवर आणि तोंडाच्या पोकळीत अल्प प्रमाणात रक्तस्त्रावासह किंवा त्याशिवाय त्वचेवर पुरळ दिसू शकतो. याची नोंद घ्यावी की, डेंग्यूमुळे मुलांचा चेहरा, अंगावर आणि हातपाय लाल होण्याची शक्यता असते.
मुलांमध्ये वेक्टर-बोर्न रोगांचा पतिबंध करण्याच्या दोन मुख्य घटकांमध्ये यांचा समावेश आहेः
१) वैयक्तिक संरक्षण आणि
२) डासांवर नियंत्रण.
वैयक्तिक संरक्षणामध्ये खिडकीला जाळ्या लावणे, मच्छरदाणी आणि रिपेलंट वापरणे यांचा समावेश आहे. तसेच, मुलाला फिकट रंगाचे कपडे आणि पूर्ण हात व पाय झाकणारे कपडे घातल्यास त्यामुळे त्यांचे संरक्षण करण्यास मदत होते.
डासांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, घरात आणि आसपासच्या परिसरात पाणी साचू देऊ नये आणि कूलर, पक्षांची भांडी, फुलदाणी, यातील पाणी नियमितपणे बदलावे. त्याचप्रमाणे, पाण्याची टाकी आणि पाणी साठवण्याचे कंटेनर्स घट्ट झाकून ठेवावेत.
सोसायट्यांमध्ये कारंजे किंवा जलतरण तलाव अथवा कृत्रिम तलाव असल्यास, त्याची नियमित देखभाल करणे आणि डासांची पैदास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी पाणी बदलणे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे, प्रत्येक सोसायटीमध्ये डास होतील अशा जागा नष्ट कराव्यात आणि वारंवार धुराचे फॉगिंग करून डासांवर नियंत्रण ठेवावे.
जेव्हा एखाद्या मुलाला डेंग्यूची लागण होते तेव्हा रुग्णाला तीन टप्प्यांतून जावे लागते. पहिल्या टप्प्यात, मुलाला ताप येतो जो २ ते ५ दिवस राहतो. या टप्प्यात, आईवडिलांना डॉक्टरांनी लिहून दिल्यानुसार उपचार सुरू ठेवण्याचा आणि मुलाच्या शरीरातील पाणी कमी होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.
या टप्प्यात, आवश्यक असल्यास, संपूर्ण रक्तेपशींची संख्या समजून घेण्यासाठी उपचार देणारे डॉक्टर रक्ताची तपासणी करण्याचा सल्ला देण्याची शक्यता आहे.
दुसरा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो जेव्हा मुलांच्या शरीरातील प्रमुख अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही आणि त्यानंतर अवयवांमध्ये बिघाड होऊ लागतो. अशा प्रसंगी, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या केसेसमध्ये, डॉक्टर पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेट्स, सी-रिअॅक्टिव्ह पोटीन, फेरीटिन वगैरेंचे विश्लेषण करण्यासाठी सहाय्यक चाचण्या करण्याची शिफारस करण्याची शक्यता असते.
डेंग्यू झाल्यास अशा वेळी, कुटुंबियांनी त्या मुलाच्या शरीरातील पाणी कमी होणार नाही याची आणि योग्य औषधांनी तापावर नियंत्रण ठेवण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
तिसरा टप्पा म्हणजे बरे होण्याचा टप्पा असतो ज्यात मुलाला ८ ते १० दिवस तापानंतर लक्षणांमध्ये सुधारणा होत असल्याचे जाणवू लागते. रूग्णालयातून घरी सोडण्यापूर्वी, उपचार देणारे डॉक्टर मागील २४ तासांत मुलाला आला ताप नाही आणि त्याची भूक वाढली आहे व सर्वसामान्य आरोग्य चांगले आहे (अवयव सामान्यपणे काम करत आहेत, प्लेटलेटसची संख्या ५०,०००/एमएम३ पेक्षा अधिक आहे आणि इतर कोणत्याही गंभीर समस्या नाहीत) याची खात्री करून घेतात.
पालक म्हणून, तुमच्या मुलांसाठी मॉस्किटो रिपेलंट निवडताना, आपण परिणामकारकता आणि मुलांची सुरक्षितता या दोन्हीचा विचार केला पाहिजे. मॉस्किटो रिपेलंटस हे फवारण्या, स्टिक्स, ड्रॉप्स, क्रीम अशा वेगवेगळ्या स्वरूपात उपलब्ध असल्यामुळे, आपण ते रासायनिक प्रक्रियेद्वारे बनविले आहे की नैसर्गिक घटकांपासून हे पाहण्यासाठी त्यातील घटक तपासून पाहिले पाहिजेत.
रिपेलंटमध्ये डीईईटी (डायइथाइलटोल्युअमाइड) असल्यास, बाळ आणि मुलांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले त्याचे एकवटलेले (कॉन्सेन्ट्रेटेड) स्वरूप १०-३०% असले पाहिजे, जी २ ते ५ तास प्रभावीपणे काम करते. परंतू, २ महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांचा डीईईडीशी संफ येऊ देऊ नये.
त्याचपमाणे, लिंबू-निलगिरीचे तेल आणि आवश्यक तेले यामुळे मुलांचे डासांपासून काही तास रक्षण होऊ शकते. तथापि, अॅलर्जीच्या पतिक्रियांचा अभ्यास करणे आवश्यक आहे आणि अशा रिपेलंट्सचा वापर करताना काळजी घेतली पाहिजे.
डासांपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांसाठी मच्छरदाणी आणि रॅकेट सर्वात सुरक्षित समजले जातात, तर क्रीम, लोशन, स्टिक, लिक्विड व्हेपोरायझर्स यांचा सावधगिरीने उपयोग केल्यास ते तुलनेने सुरक्षित असतात.
मुलांचे डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियापासून रक्षण करण्यासाठी डास चावण्यापासून त्यांचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे. आवश्यक खबरदारी आणि योग्य उपाययोजना केल्यास अशा आजारांपासून मुलांचे रक्षण होऊ शकते.
१. डासांमुळे होणाऱ्या रोगांना प्रतिबंध - पालकांसाठी आयएपी मार्गदर्शन
२. डासांमुळे होणाऱ्या रोगांना प्रतिबंध - पालकांसाठी आयएपी मार्गदर्शन
३. आयएपीः प्रमाणित उपचारांसाठी मार्गदर्शन २०२२ - मुलांमधील डेंग्यू
४. डासांमुळे होणाऱ्या रोगांना प्रतिबंध - पालकांसाठी आयएपी मार्गदर्शन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.