Dengue in Delhi News: पाऊस आणि पूरजन्य परिस्थितीनंतर दिल्लीसह पूर्ण एनसीआर परिसरात डेंग्यू तापाच्या रुग्णांमध्ये (dengue cases) वाढ होत असल्याचे दिसत आहे. यातही डेंग्यू विषाणूचा धोकादायक स्ट्रेन राजधानी दिल्लीमध्ये पसरत आहे. यामुळे परिसरातील स्थिती सध्या फार गंभीर होत आहे.
त्यामुळे वेळीच खबरदारी न घेतल्यास अधिक गंभीर परिस्थिती ओढावू शकतो. डेंग्यू विषाणूचे चार (डेन-1, डेन-2, डेन-3 आणि डेन-4) प्रकार आहेत, ज्यामध्ये डेन-2 हा प्रकार अतिशय धोकादायक असतो. दिल्लीमध्ये करण्यात आलेल्या तपासादरम्यान डेंग्यू विषाणूच्या डेन-2 स्ट्रेनची साथ पसरल्याची पुष्टी करण्यात आली आहे. या काळात रुग्णाला रक्तस्राव होऊन ताप येणे धोकादायक मानले जाते.
डेंग्यू विषाणूचे डेन-1 आणि डेन-3 स्ट्रेनमधील लक्षणे तुलनेनं सौम्य असतात, तर डेन-2 हा प्रकार अधिक गंभीर असतात. दिल्लीमध्ये आढळलेल्या डेन -2 स्ट्रेनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ताप येणे, गुडघेदुखी, डोळे दुखी, तीव्र स्वरुपातील डोकेदुखी, त्वचेला खाज येणे आणि स्नायूदुखी अशी लक्षणे आढळून येतात. ही लक्षणे काही प्रमाणात चिकनगुनिया आजारासारखीच असतात.
रक्तस्राव होऊ ताप आल्यास रुग्णाची परिस्थिती गंभीर होऊ शकते. या स्थितीत शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते, ज्यामुळे शरीराच्या आता आणि बाहेरूनही रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. सोबतच पोटदुखीचीही समस्या वाढते आणि नाक, हिरड्या, उलट्या, मल यातून रक्त येऊ लागते.
याचदरम्यान त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवतात. एकूणच डेंग्यूच्या विषाणूचा डेन-2 हा प्रकार धोकादायक असतो आणि रुग्ण शॉक सिंड्रोमच्या अवस्थेतही जाऊ शकतो. रक्तदाबही अचानक कमी होण्याची शक्यता असते.
दुसरीकडे जर दोन-तीन वर्षांपूर्वी डेंग्यू तापाचा संसर्ग होऊन गेला असल्यास आपण सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. या आजारपासून संरक्षण करायचे असेल तर घराच्या आसपास पाणी जमा होऊ देऊ नये. स्वच्छता बाळगा. आहारातमध्ये आरोग्यवर्धक खाद्यपदार्थांचा समावेश करावा. शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी नियमित व्यायाम देखील करावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.