Depression : घरातच लपलंय डिप्रेशनवर गुणकारी औषध

Depression
DepressionSakal
Updated on

Food For Depression Recovery : भोपळ्याचे नाव ऐकताच बहुतेकांचे तोंड वाकडे होते. कारण अनेकांना याची चव आवडत नाही. बाजारात दोन प्रकारचे भोपळे विक्रीस असतात. ज्यात पांढरा आणि लाल भोपळ्याचा समावेश आहे.

हेही वाचा : विमा पाॅलिसींचे डी-मॅट पाॅलिसीधारकांनाच पोहचवेल नुकसान?

Mental Health: Tips for parenting
Mental Health: Tips for parentingesakal
Depression
Fruits in Winter Season: हिवाळ्यात 'ही' पाच फळे तुम्ही खायलाच हवी!

मात्र, बाजारात उपलब्ध असलेल्या या दोन्ही भोपळ्यांमधील नेमका फरक काय? आणि यातील कोणता भोपळा आरोग्यासाठी चांगला आहे याबद्दल सांगणार आहोत. दोन्ही भोपळ्यांचे आरोग्यासाठीचे फायदे वाचून नक्कीच न खाणारे लोकही जेवणात अगदी आनंदाने याचा समावेश करतील.

पांढऱ्या भोपळ्याचे सेवन केल्याने श्वसन प्रणाली, कोलेस्ट्रॉलची पातळी आणि डोळे निरोगी राहण्यास मदत होते. याशिवाय शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरतादेखील पूर्ण होण्यास मदत होते.

Kids
Kidsesakal
Depression
Deodorant Myth : डिओड्रंट लावल्याने ब्रेस्ट कॅन्सर होतो? जाणून घेऊयात सत्य!

पांढऱ्या भोपळ्यात नेमकं काय?

पांढऱ्या भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात उपलब्ध असते. यासोबतच यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयरन, फोलेट, नियासिन आणि थायामिन सारखे खनिजेदेखील असतात. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होण्यास मदत होते.

भोपळा खाण्याचे फायदे

पांढरा भोपळा फायटोस्टेरॉलने समृद्ध असा आहे. याच्या सेवनामुळे कंपाऊंड कोलेस्ट्रॉलची पातळी सामान्य ठेवण्यास मदत होते. तसेच शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. त्यामुळे हृदय आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

Depression
Breast Size : स्तनांची अतिरिक्त वाढ त्रासदायक ठरतेय ? हे घरगुती उपाय करा

एंटी डिप्रेसेंट

ट्रिप्टोफॅनच्या कमतरतेमुळे नैराश्य येते. पांढऱ्या भोपळ्यामध्ये एल-ट्रिप्टोफॅन भरपूर प्रमाणात असते. हे एक अत्यावश्यक अमीनो अॅसिड असून, जे शरीर तयार करू शकत नाही. त्यामुळे तुम्हालाही सतत नैराश्य येत असेल तर, हा त्रास कमी करण्यासाठी जेवणात अवश्य पांढऱ्या भोपळ्याचा समावेश करा. यामुळे नैराश्य कमी होऊन मन आनंदी राहण्यास मदत होते.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर

पांढरा भोपळा ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनने समृद्ध असून, यामुळे डोळ्यांचे रॅडिकल्सपासून होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करण्यास मदत करते. तसेच मोतीबिंदूपासून बचाव करण्यास मदत करते. पांढऱ्या भोपळ्याचे नियमित सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. कारण यामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात उपलब्ध असते.

Depression
Mental Health: टीनेजमधल्या 'या' चुकीच्या सवयींमुळे येईल डिप्रेशन; मुलांनो, वेळीच सावध व्हा!

अस्थमामध्ये फायदेशीर

पांढऱ्या भोपळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स श्वसनसंस्थेला संसर्ग आणि फ्री रॅडिकल्सपासून वाचवतात. त्यामुळे दम्याच्या रुग्णांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()