दूध हा आपल्या दैनंदिन आहारातील अत्यंच महत्वपूर्ण पदार्थ आहे. भारतातील प्रत्येक घरामध्ये दूध Milk गरजेचं असतं. आरोग्याच्या Health दृष्टीने दूध अत्यंत महत्वाचा घटक असल्याने घराघरात दूधाची आवश्यकता भासते. Detect urea or detergent powder Adultration from milk
मात्र अलिकडे मोठ्या प्रमाणात दूधात भेसळ Aduletration होत असल्याचं बातम्यांच्या माध्यमातून आपल्या समोर येतं असतं. काहीजण युरिया किंवा डिटर्जंट पावडर टाकून दुधात Milk भेसळ करतात. तर काही पाणी टाकून ग्राहकांची Customers फसवणूक करतात.
दिवसेंदिवस दुधाचे दरही वाढत आहेत. दुधासाठी पैसे देऊनही जर तुमच्या घरात येणारं दूध भेसळयुक्त असेल तर? दुधात भेसळ होत असल्यास तुमच्या खिशाला तर कात्री लागेच शिवाय आरोग्यासाठी Health ते खूप धोकादायक ठरू शकतं. खास करून जर हे दूध तुम्ही घरातील लहान मुलांना देत असाल तर काळजी घेणं गरजेचं आहे.
दुधात भेसळ आहे की नाही हे कसं ओळखणार असा प्रश्न तुमच्या समोर पडला असेल. तर आम्ही तुम्हाला ही भेसळ ओळखण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.
हे देखिल वाचा-
वासावरून दुधाची परीक्षा- दुधाला एक खास प्रकारचा वास असतो. ते सुगंधी असतं. तर भेसळयुक्त दुधाला कोणताही गंध नसतो किंवा त्याला एक विचित्र वास येऊ शकतो.check purity of milk
कलर टेस्ट- शुद्ध दूध पांढऱ्या शुभ्र रंगाचं असतं तर भेसळ असलेलं दूध थोड डार्क किंवा जास्त पिवळसर असू शकतं.अनेकदा शुद्ध दूध तापवल्यावर रंग बदलत नाही तर अशुद्ध दूध तापवल्यावर ते अधिक पिवळं दिसू लागतं.
दुधाचा प्रवाह- दूध शुद्ध आहे का हे तपासण्यासाठी एखाद्या स्वच्छ सपाट जागेवर दुधाचे ४-५ थेंब टाका. जर दूध कोणतीही निशाणी न सोडता एखाद्या दिशेला वाहत गेलं तर त्यात भेसळ आहे आणि जर दूध त्याच ठिकाणी काही काळ थांबून राहिलं किंवा हळू हळू पुढे सरकलं आणि मागे पांढऱ्या ओघळाचे डाग राहिले तर ते दूध शुद्ध आहे असं ओळखावं.
लिटमस टेस्ट- दूधात भेसळ करण्यासाठी युरियाचा मोठ्या प्रमाणावर अधिकतर वापर केला जातो. युरियामुळे दुधाचा रंग बदलत नसल्याने अनेक भेसळ करणारे युरिया वापरतात. मात्र लिटमस पेपरच्या मदतीने ही भेसळ ओळखणं शक्य आहे.
यासाठी अर्धा चमचा दूध आणि सोयबीन पावडर एकत्र मिसळा. यात लिटमस पेपर काही वेळ बुडवून ठेवा. लिटमस पेपरचा रंग लालहून निळा झाला तर दुधात भेसळ आहे असं समजावं.check purity of milk at home
दूधाच्या फेसावरून ओळखा शुद्धता- दुधामध्ये डिटर्जंट आहे की नाही हे ओळखण्यासाठी जवळपास २ चमचे दूध एका काचेच्या बाटलीत घ्या. ही बाटली जोरात हलवा. जर बाटलीत फेस झाला आणि तो खूप वेळाने खाली बसला तर तुमच्या दुधात भेसळ आहे हे समजून जा आणि जर दुधाचा फेस तयार झाला नाही तर ते दूध शुद्ध आहे.
हातावर रब करा- याचसोबत आणखी एका प्रकारे तुम्ही दुधातील भेसळ ओळखू शकता. यासाठी चमचाभर दूध हातावर घ्या आणि दोन्ही हात एकमेकांना चोळा. शुद्ध दूध असेल तर हातांना चिकटपणा जाणवणार नाही आणि दूध अशुद्ध किंवा त्यात भेसळ असेल तर हाताला एक चिकटपणा जाणवेल.
हे देखिल वाचा-
भेसळयुक्त दुधाच्या सेवनाचे दुष्परिणाम
भेसळयुक्त दुधात स्टार्ट मिसळल्याने या दुधात हायड्रोजन पॅरॉक्साइड, अमोनिया, नायट्रेट फर्टिलायझर आणि न्यूट्रलायझर ही तत्व वाढतात. ज्यामुळे आतडी, किडनी आणि लिवरसह अनेक अवयवांवर नकारात्मक परिणाम होवू शकतो.
दुधात पाणी टाकल्याने ते पातळ होतं आणि त्यातील पोषक तत्व कमी होवून त्याचा शरीरासाठी कमी फायदा होतो.
सिंथेटिक दूध तयार करण्यासाठी यात युरिया, कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर, सोडा आणि फॉरेमॅलिन मिसळलं जातं. यामुळे फूड पॉयझनिंय होवू शकतं. तसचं उल्टी आणि जुलाब अशा समस्याही निर्माण होवू शकतात.
यासाठीच वरिल टिप्सच्या मदतीने तुम्ही घरच्या घरीच दूध भेसळयुक्त नाही ना याची खात्री करून घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.