Diabetes Causing Food : भारतात हल्ली वेगाने वाढणाऱ्या आजारांपैकी एक आजार म्हणजे मधुमेह. मधुमेह होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. बॅड लाइफस्टाइल आणि डाएट यांमुळे दिवसेंदिवस मधुमेहाच्या समस्या वाढतच चालल्या आहेत.
अलीकेडच अमेरिकेच्या टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या फ्रीडमॅन स्कूल ऑफ न्यूट्रीशन अँड सायन्सच्या संशोधकांनी त्यांच्या अभ्यासातून मधुमेह होण्यामागच्या दोन मुख्य कारणांचा शोध लावलाय. चिंतेचा विषय म्हणजे ही दोन्ही कारणं खाण्या पिण्याच्या सवयींशी जुडली आहेत.
त्यांच्या मते, खाण्यापिण्यातील या दोन गोष्टींमुळे संपूर्ण जगात मधुमेहाच्या रूग्णांची संख्या वाढत चाललीय. याबाबत आज आपण सविस्तर जाणून घेऊया.
मधुमेहाच्या रूग्णांत 70 टक्क्यांनी वाढ
नॅचरल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासात असे दिसून आलेय की 2018 मध्ये खाण्याच्या सवयींमुळे जगभरात डायबिटीजचे रूग्ण झपाट्याने वाढत चाललेय. नव्या रूग्णांमध्ये तब्बल 70 टक्क्यांनी वाढ झालीय.
या दोन गोष्टी वाढवताय मधुमेहाचा धोका
शास्त्रज्ञांनी सांगितले की रिफाइंड तांदूळ आणि गहू यांचे अधिक सेवन केल्याने टाइप २ डायबिटीजचा धोका वाढतोय. त्यांच्या मते कार्बोहायड्रेटच्या खराब गुणवत्तेने आफ्रीका, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका आणि दक्षिण एशियात मधुमेहाचा धोका वाढलाय. (Health)
मधुमेहाच्या रूग्णांनी असा डाएट प्लान फॉलो करावा
अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, तुमच्या प्लेटचा अर्धा भाग नॉन स्टार्च भाज्यांनी, प्लेटचा एक चतुर्थांश भाग चिकन, टर्की यांसारख्या थीन प्रोटीन आणि एक चतुर्थांश कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांनी भरलेला असावा. याशिवाय चहा किंवा कॉफी आणि साखर नसलेले पेयांचे सेवन करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.