Diabetes : कॉफीचे सेवन मधुमेहींसाठी ठरले जीवदान; रक्तशर्करा राहील नियंत्रणात

मधुमेह हा जीवनशैली आणि आहाराशी संबंधित आजार आहे.
Diabetes
Diabetes google
Updated on

मुंबई : बहुतेक तज्ज्ञ अशा गोष्टी सकाळी खाण्याची शिफारस करतात, ज्यामुळे तुम्हाला कोणतीही हानी न होता दीर्घकाळ ताजेतवाने वाटेल. अशा वेळी कॉफी आणि चहाचा विचार आधी येतो. पण मधुमेहींसाठी ही निवड इतकी सोपी नाही.

मधुमेह हा जीवनशैली आणि आहाराशी संबंधित आजार आहे. अशा स्थितीत मधुमेहाने त्रस्त असलेल्या लोकांना सकाळी उठल्याबरोबर आहाराची काळजी घ्यावी लागते.

दरवर्षी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक कॉफी दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने मधुमेहामध्ये कॉफी पिण्याचे फायदे जाणून घेऊ या. एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, कॉफी प्यायल्याने टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका कमी होतो.

Diabetes
Smartphone : एका चार्जमध्ये ७ दिवस चालेल हा waterproof smartphone

कॉफीचा प्रत्येक घोट आरोग्यदायी असतो

कॉफीमध्ये कॅफिन आणि पॉलीफेनॉलसह शरीरावर वेगवेगळे परिणाम करणारी अनेक रसायने असतात. पॉलीफेनॉल हे अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असलेले रेणू आहेत, जे टाइप 2 मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोगासह विविध रोगांना प्रतिबंधित करण्यास मदत करतात.

याव्यतिरिक्त, कॉफीमध्ये मॅग्नेशियम आणि क्रोमियम ही खनिजे देखील असतात. जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी भरपूर कॉफी प्या

पबमेडच्या मते, दररोज ३ ते ४ कप कॉफी प्यायल्याने एखाद्या व्यक्तीला टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका कमी होतो. अभ्यासात असेही आढळून आले की ज्या लोकांनी दररोज 1 कप पेक्षा जास्त कॉफीचे सेवन कमी केले त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता 17% पर्यंत जास्त आहे.

Diabetes
वृद्धांसाठी आनंदाची बातमी ! मिळणार ३६ हजार रुपये पेन्शन

ब्लॅक कॉफी मधुमेहावर अधिक प्रभावी आहे

साधी कॉफी थेट रक्तातील साखर वाढवत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ब्लॅक कॉफी आवडत असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असू शकते. काही तज्ञ असेही सुचवतात की मधुमेहींनी इंसुलिनच्या संवेदनशीलतेवर परिणाम न करता अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे यांसारख्या घटकांचे फायदे मिळविण्यासाठी डीकॅफिनेटेड कॉफी प्यावी.

व्यायामापूर्वी कॉफी पिणे फायदेशीर आहे

NIH च्या मते, व्यायाम करण्यापूर्वी कॅफीन प्यायल्याने टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.