डायबेटिस म्हणजेच मधुमेह या आजारावर अद्याप उपचार नसले तरी अनेक मार्गांनी यावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे. काही घरगुती उपचार किंवा आयुर्वेदाची मदत घेऊन रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते. जर तुम्हाला मधुमेह Diabetes असेल तर तुमच्या घरी इन्श्युलिनचे Insulin रोप नक्की लावा. होय हे रोप तुमची साखरेची पातळी कमी करण्यासाठी नक्कीच मदत करेल. Diabetes Control Drink Insulin leaves boiled water Marathi Health Tips
इन्श्युलिनचे रोप मधुमेहामध्ये शुगर कंट्रोल करण्यास मदत करतं. या रोपातील अर्कात काही असे गुण असतात ज्यामुळे इन्सुलिन Insulin वाढण्यास मदत होते आणि शुगर पचवायला मदत होते.फास्टिंग शुगर Fasting Sugar नियंत्रणात राखण्यासाठी तुम्हाला या रोपाची कशी मदत होवू शकते हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
इन्श्युलिन रोप कसं करत काम
इन्शुलिन प्लांटचं वैज्ञानिक नाव कॉस्टस इगनियस Costus igneus असं आहे. या रोपामध्ये कॉर्सेलिक ऍसिड मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. या रोपाच्या पानांच्या अर्काच्या सेवनामुळे कॉर्सेलिक ऍसिड स्वादुपिंडातून इन्श्युलिन स्रावास प्रोत्साहन देतं. यामुळे साखरेचं ग्लायकोजेनमध्ये रुपांतर सुरू होते.
यात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असतं. यात पाण्यात विरघळणारे घटक असल्याने रक्तातील ग्लुकोजच शोषण कमी होण्यास मदत होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास ही वनस्पती काम करते.
हे देखिल वाचा-
असं करा सेवन
जर तुमची शुगर नियंत्रणात Sugar Control नसेल तर तुम्हाला इन्श्युलिन रोपाची काही पानं उकळून याचा वापर करावा लागेल. याची काही पानं धुवून १ ग्लास पाण्यात उकळून घ्यावी. हे पाणी उकळून कमी झालं आणि पाण्याला हिरवा रंग आला कि वरून थोडं मीठ टाकावं. त्यानंतर पाणी थोडं गार झालं की त्याच सेवन करावं.
याशिवाय तुम्ही दररोज या रोपाचं १ पान चावून खावू शकता. यासाठी १ पान स्वच्छ धुवून चावून खावं आणि एक ग्लास पाणी प्यावं.
तसचं तुम्ही या रोपाती पानं सावलीमध्ये वाळवून त्याची पावडर बनवून ठेवू शकता. आवश्यकतेनुसार तुम्ही ही पावडर पाण्यात उकळून ते पाणी गाळून पिऊ शकता. insulin plant leaf benefits
कधी प्यावं हे पाणी
इन्श्युलिनचं पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र त्याचं योग्य वेळी सेवन करणं गरजेचं आहे. जस तुम्हाला फास्टिंग शुगर नियंत्रणात ठेवायची आहे तर हे पाणी संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी प्यावं. हे तुमच्या शरीरातील इन्श्युलिनचं प्रमाण वाढवून साखर चयापचय जलद हतीने करण्यास मदत करतं. त्यामुळे फास्टिंग शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
कॉस्टस इग्निस Costus Igneus या वनस्पतीमध्ये प्रोटीन, सेपोनिन्स, टेनिन्स, स्टीरॉयड आढळतं. तसचं या रोपात फ्लेवनॉइड्स, अल्केलॉइड्स, अँटीऑक्सिडंट, एक्सॉर्बिक ऍसिड. आयरन, बी कॅरेटीन असे अनेक त्तव आढळतात. Insulin leaves water for diabetes
इन्श्युलिन रोपाचे इतर फायदे
यातील अनेक पोषक गुणतत्वांचा मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासोबतच डोळे आणि फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी देखील फायदा होतो. तसचं सर्दी, खोकला, त्वचा, दमा, बद्धकोष्ठता आणि जुलाब अशा अनेक समस्यांवर ही वनस्पती गुणकारी आहे.
टीप- हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. स्वयंउपचार करण्यापूर्वी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.