Diabetes Control Tips : महागड्या नव्हे तर, आयुर्वेदातील औषधांनी करा मधूमेहावर मात

डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी जेवणावर कंट्रोल ठेवण गरजेचं
Diabetes Control Tips
Diabetes Control Tips esakal
Updated on

Diabetes Control Tips : डायबिटीस कंट्रोल मध्ये ठेवण्यासाठी रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितलेले आहेत. आपल्या डेली रूटीन मध्ये थोडेसे बदल आणि थोडासा व्यायाम देखील आपली रक्तातली शुगर कंट्रोल मध्ये ठेवते.

Diabetes Control Tips
High BP Control Tips: बीपी अचानक वाढतंय? लगेच आराम देईल या फळाचे साल

नियमित व्यायाम करा

अर्थात नियमित व्यायाम करणं काही फक्त डायबिटीस साठीच नाही तर एकंदरीत फिट अँड फाईन आयुष्य जगण्यासाठी खूप गरजेचं आहे. शिवाय याने आपली रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते; आणि त्वचाही खुलते. जर तुम्हाला हाय बीपी आणि हाय कोलेस्टेरॉल सारख्या आजारांना टाळायच असेल तर तुम्ही नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे.

Diabetes Control Tips
Diabetes Tips: आता डायबिटीज रुग्णही खाऊ शकतात गोड; फक्त या गोष्टींची घ्या काळजी

ध्यान लावणे

आजकाल लोकांना आपल्या कामाच्या ठिकाणी इतर ठिकाणी खूप जास्त स्ट्रेस असतो; सतत काहीना काही स्ट्रेस वाढवणाऱ्या गोष्टी समोर येतात; आयुर्वेदानुसार, रोज किमान अर्धा तास ध्यान लावल्याने मेडिटेशन केल्याने खूप फरक पडू शकतो.

Diabetes Control Tips
Diabetes Diet Tips: गव्हाची पोळी खाल्ल्यानेही वाढू शकतो मधुमेह; जाणून घ्या कोणत्या पिठाची भाकरी असते फायदेशीर

डाएट

डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या जेवणावर काय खातो आहोत यावर कंट्रोल ठेवण गरजेचं आहे. जास्त फॅट असलेले, ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असलेले आणि शुगर कंटेंट असलेले कोल्ड्रिंक्स खाणे किंवा पिणे टाळा.

Diabetes Control Tips
Coffee Recipe : आता घरीच बनवा कॅफे स्टाईल कॉफी

ड्रिंक्स किंवा ज्यूस

इतर कोणतेही ड्रिंक्स पिणं घातक ठरू शकत. त्यापेक्षा आयुर्वेदिक दृष्ट्या चांगले असलेले ज्यूस जास्त फायदेशीर असतात. हे ज्यूस आपल्याला आपले अन्न पचवण्यासाठी मदत करतात, ऊर्जा वाढवतात, कार्बोहायड्रेट नियंत्रित करतात आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतात. आवळा, जांभूळ, कारले यांचे ज्यूस तब्बेतीसाठी खूप चांगले असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.