Diabetes and Covid 19 Virus : जगात परत एकदा व्हायरसचे प्रमाण वाढले आहे आपल्या भारत देशातही अनेक राज्यांमध्ये कोविड-19 चा कहर पुन्हा एकदा दिसून येतो आहे. कोविडने परत डोकं वर काढल्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे. तज्ञांच्या मते, कोरोनाव्हायरस परत एकदा तयार होऊन सर्वत्र पसरतो आहे आणि यावेळी त्याचे वेगवेगळे व्हेरिएन्ट बाहेर येता आहेत.
गेल्या काही दिवसांत हजारो लोक कोविड संसर्गाच्या विळख्यात आले असून सरकारनेही आवश्यक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांवर विश्वास ठेवला तर पुढील काही काळात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ शकते. सर्वांनी आवश्यक पावले उचलली तर परिस्थिती लवकरच आटोक्यात येऊ शकते.
दिल्ली मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल बन्सल म्हणतात की, जर लोकांनी कोविड संसर्गाबाबत दक्षता घेतली नाही तर पुढील काही काळात परिस्थिती आणखी बिघडू शकते. बहुतेक लोकांना कोविडची लस मिळाली आहे आणि त्यांच्या आत अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत.
अशा परिस्थितीत, कोविडचा सामना करण्यासाठी काही प्रमाणात मदत होईल. पण, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर असे लोक संसर्गाच्या विळख्यात आले तर ते त्यांच्यासाठी घातकही ठरु शकते. हे टाळण्यासाठी लहान मुले आणि वृद्धांनाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
अशा रुग्णांना कोविडमुळे मृत्यूचा धोका जास्त असतो
- डायबीटीस आणि ब्लड प्रेशरचे रुग्ण संसर्गाच्या विळख्यात येऊन गंभीर स्थितीत पोहोचू शकतात.
- कोविड संसर्ग टीबी आणि अस्थमाच्या रुग्णांसाठी घातक ठरु शकतो.
- हार्ट अटॅक आणि एचआयव्ही असलेल्या रुग्णांना कोविड संसर्गामुळे मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो.
- अनेक प्रकारच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी कोविड अत्यंत घातक ठरु शकतो.
- अशक्तपणाने ग्रस्त असलेल्या महिलांची कोरोना संसर्गामुळे गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते.
कोविड-19 पासून संरक्षण कसे करावे
डॉ. अनिल बन्सल यांच्या मते, ज्यांना आधीच आजार आहेत त्यांनी कोविड संसर्ग टाळण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि घराबाहेर पडताना फेस मास्क लावावा. हात वारंवार स्वच्छ करावेत किंवा साबणाने धुवावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने लस द्यावी. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असेल तर सकस आहार घ्यावा. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास योग्य डॉक्टरांकडूनच उपचार घ्यावेत. संसर्गाबाबत कोणताही निष्काळजीपणा करु नये.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.