Diabetes: आजकालच्या धावपळीच्या जीवनात आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे अनेक आजार निर्माण होत आहेत. यामध्ये मधुमेह हा एक आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्यासाठी औषधे आणि घरगुती उपाय करतात.
द हेल्थ साइटने दिलेल्या वृत्तानुसार सदाफुलीचे रोप मधुमेह नियंत्रात ठेऊ शकतो. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी सदाफुली वनस्पतीचे पानं आणि फुलांपासून बनवलेले उपाय वापरले जातात.
सदाफुलीमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात. या घटकांमुळे आयुर्वेदात सदाफुलीचे फुले आणि पानांचे मधुमेह नियंत्रणासाठी प्रभावी औषध म्हणून वर्णन केले आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी सदाफलीचे सेवन कसे करावे ते जाणून घेऊया.