प्रश्र्न १ - माझे वय ५० वर्षे आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी मधुमेहाचे व त्याआधी साधारण ३-४ वर्षे थायरॉइडचे निदान झालेले आहे. कुठल्याही कामात लक्ष लागत नाही. संपूर्ण शरीर दुखते आहे, असे सतत जाणवत राहते. पाळी वयाच्या ३५ व्या वर्षीच गेल्यामुळे मैथुनात रुची वाटत नाही. या सगळ्या त्रासांमुळे नवरा आणि मुले यांच्याबरोबरच्या संबंधांत खूप ताण आलेला आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
- शिल्पा देवधर, नवी मुंबई
उत्तर - स्त्रियांमध्ये हॉर्मोन्सच्या असंतुलनाचे असे परिणाम बऱ्याचदा दिसतात.कमी वयात पाळी जाणे हे आरोग्यासाठी अत्यंत घातक असते. या गोष्टीकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते व त्याचे परिणाम म्हणून शरीरात वार्धक्याची सुरुवात लवकर व्हायला लागते. फळांचे रस, हर्बल चहा, दूध, ताक वगैरे रसवर्धक गोष्टी रोजच्या आहारात खाण्यात ठेवाव्या.
प्रकृतीनुरूप शतावरी सॅन, अनंत सॅन गोळ्या नियमित घेतल्याचा फायदा होऊ शकेल. शरीरात ताकद व उत्साह टिकून राहण्याच्या दृष्टीने मॅरोसॅनसारखे रसायन घेण्याचा फायदा होईल. शरीरात साखरेचे प्रमाण फार नसले तर धात्री रसायन, स्त्री संतुलन कल्प टाकून दूध घेण्याचा फायदा होऊ शकले. शरीरात कुठल्या व्हिटॅमिनची कमतरता आहे का हे बघणे उत्तम राहील.
स्त्री संतुलनाच्या दृष्टीने फेमिसॅन सिद्ध तेलाचा पिचू योनीभागी घेणे लाभदायक राहील. एकूणच सर्व त्रास लक्षात घेतले असता संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेण्याचा व बरोबरीने आयुर्वेदिक औषधे घेण्याचा फायदा होऊ शकेल.
गोळ्या घेऊन साखर नियंत्रणात आहे किंवा टीएसएच ठीक आहे, हे पाहून शरीराची चयापचय क्रिया ठीक आहे असे समजणे योग्य नव्हे, किंवा यामुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारत नाही, हे लक्षात घेऊन आयुर्वेदिक उपचार घेणे अधिक योग्य ठरेल.